पिंजर (प्रतिनिधी) : दि.25 जुलै 2019 रोजी कु. समृद्धी राजेश ठाकरे रा. कारंजा ह.मु. पिंजर ही मुलगी ईयता दहावीत शिक्षण घेत असताना अचानक 25 जुलै रोजी सकाळी शाळेत असतांना माझे पोट दुखत आहे असे म्हणुन ती चक्कर येऊन पडली आणी लगेच तिला शिक्षकांनी पिंजर येथील खाजगी डाॅक्टरकडे नेले. आणी तेथे इलाज करुन आपल्या आजीसह मुलीला कारंजा येथे आई वडीलांकडे पोहचुन दीले. तेथे लगेच आई वडीलांनी कारंजा येथील हाॅस्पिटल मधे भरती केले. तेथील डाॅक्टरानी तपासणी केली आणी तात्काळ अकोला येथे नेण्याचे सांगितले. लगेच एका रुग्णवाहिकेने अकोला येथे नेत असतांना मुर्तीजापुर नजिक यामुलीचा मृत्यू झाला. अशी हृदयकारक घटना घडल्यामुळे पिंजर शहरात एकच खळबळ उडाली.
राजेश ठाकरे यांना एकुलती एक अशी हुशार आणी सुंदर मुलगी गेल्याने दुखा:चा डोंगरच कोसळला यामुळे एक माहिती पुढे आली की, गावात ब-यापैकी दुकानदारां जवळ मातीच्या पुडया मिळतात आणी ह्या पुडया जास्तीत जास्त मुलमुली विकत घेऊन खातात. केवळ एक रुपयामधे ही पुडी मिळते. आणी ही पुडी एक पांढ-या प्लास्टिकच्या पिशवीत पाच सहा मातीचे खडे टाकुन यावर कुठल्याही कंपनीचे नाव आणी तारीख वैगरे काहीही लीहलेले नाही अशा हजारो पुडया ग्रामीण तथा शहरी भागात मोठ्या प्रमाणावर दररोज विकल्या जात आहेत.
अगदी तंबाखु खर्रा प्रमाणे या मातीच्या पुडया खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातलेच हे उदाहरण समाजाला हेलाउन टाकणारे आहे. कार यामुलीने सुद्धा पंचवीस तारखेला सकाळीच 30 पुडया विकत घेतल्याची माहिती मुलींनी सांगीतल्यामुळे पुढे आली. दोन चार दीवसापापुन या मुलीचे तोंडही आले होते. जेव्हा दोन पुडया संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी विकत बोलावल्या तेव्हा एक पुडी फोडुन त्यातील एक मातीचा टुकडा खाऊन पहाला तेव्हा जिभेला चुनचुन लागल्यासारखे जानवले लगेच काही वेळाने तोंडात आग झाल्या सारख जानवले.
यामुळे यात काही उत्तेजणार्थ पदार्थ किंवा ईतर मानवी शरीराला घातक असे काही असेलतर नाहीना ही शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. माझ्या माहिती प्रमाणे या पुडया खालल्याने. तोंड येणे, लिवर डॅमेज होणे, भुक न लागणे, कमजोरी, घसा खराब होणे, कीडणी स्टोन होणे, मुतखडा, अशासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जीवघेण्या आजाराला सामोरे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
यावेळी लगेच पालक वर्ग तथा शिक्षक वर्ग शाळा महाविद्यालये यांनी या विषयी जागृत होऊन या गंभीर विषयावर विचारविनिमय करून पुर्णपणे आळा बसविण्यासाठी आणी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी समोर यावे…. वरील माहितीची खात्री करुन सामाजिक संघटनांनी तथा नागरिकांनी या पुडया मुलंमुलीं खाणार नाही. या बद्दल जणजागृती करुन कोवळ्या मुलांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.
अधिक वाचा : अवर अकोला न्युज इम्पॅक्ट- तेल्हारा डेपोतील बस गळती प्रकरनी वाहन परीक्षक निलंबीत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola