तेल्हारा (प्रतिनिधी) : “प्रवाशांनो सूचना तेल्हारा बसस्थानकातील बस ने प्रवास करणार मग रेनकोट छत्री घेऊनच जा” या मथळ्याखाली अवर अकोला न्युज ने सर्वात आधी तेल्हारा डेपोतील बस गळती बद्दल बातमी प्रकाशित केली होती. बातमीची दखल घेत वाहन परिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
दि २७ जुलै रोजी सकाळी अकोल्यावरून तेल्हाराकडे निघालेली तेल्हारा डेपोची बस क्रमांक एम एच ४० एन ८२८४ ही बस काही अंतरावर आल्या नंतर चक्क संपूर्ण बसलाच गळती लागल्यामुळे प्रवाशांना छत्री रेनकोट चा सहारा घेऊन पाण्यापासून बस मध्ये बचाव केला होता. या बाबत अवर अकोला न्युज ने आवाज उठवून संबंधित विभागाला जागे केले होते.
(पूर्व बातमी : प्रवाशांनो सूचना, तेल्हारा बसस्थानकातील बस ने प्रवास करणार मग रेनकोट छत्री घेऊन जा )
यासंदर्भात आगार प्रमुख एस एम वानेरे यांनी त्वरित दखल घेत दि ३० जुलै रोजी वाहन परीक्षक आर एस खराटे यांना निलंबित केले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना आदेश दिले की बसचे निरीक्षण करूनच बस मार्गस्थ करावी अन्यथा कर्त्यव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पस्ट निर्देश आगार प्रमुखाणी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कारवाईची धास्ती घेतली आहे. सदर बस ही दुरुस्ती करीता पाठवण्यात आली असून इतर बसची सुद्धा दुरुस्ती करण्यात येत आहे. अशी माहिती मिळाली आहे.
सदर निलंबन हे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी केली असून वाहन परीक्षकाचे काम हे प्रत्येक बस तपासून ती वाहतुकी योग्य आहे की नाही याचे परीक्षण करावे लागते मात्र सदर बस संपूर्ण गळत होती तर ती पाठवल्याच कशी गेली म्हणजेच वाहन परिक्षक यांनी कर्तव्यात कसूर ठेवल्यामुळे वाहन निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : अण्णाभाऊ साठे चौक शेगाव विकास आराखडा सौंदर्यीकरण यादी मध्ये समाविष्ट करा – स्वाभिमानीची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola