अकोला : वाघ लुप्त होत चालल्याने त्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. ही प्रजाती जगवणे अत्यंत गरजेचं असल्याचे मत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. अकोला वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व निसर्ग कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.29 जुलै 2019 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वसुंधरा हॉल येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
वन विभागचे उपवन संरक्षक सुधीर वळवी, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकरी विजय माने, वन्यजीव विभागाचे मनोज कुमार खैरनार, निसर्ग कट्टाचे प्रमुख अमोल सावंत हे उपस्थित होते. यावेळी ‘कौन बनेगा काटेपूर्णा अभयारण्य राजदूत’ या नवीन संकल्पने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्वांनी वाघाचे संवर्धन व संरक्षण करण्याबाबत सर्वांनी शपथ घेतली.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी काटेपूर्णा अभयारण्यात जंगल सफारीचे अयोजन करण्यात आले होते. या वेळी जंगल सफारीच्या गाडीला जिल्हाधिकारी पापळकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
अधिक वाचा : बाळापूर पोलिसांनी दिले 10 गोवंशना जीवनदान, 4 लाखाचा मुद्देमाल जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola