तेल्हारा (प्रतिनिधी) : आज सर्वत्र कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सर्वांचा वेगळा आहे.परंतु कचरा हा कचरा नसून संपत्ती आहे.कचऱ्यापासून कशाची निर्मिती होते व कचरा कशासाठी उपयोगात आणू शकतो. त्यामुळे कचरा हा कचरा नसून संपत्ती आहे असे प्रतिपादन कचऱ्याचे महत्व सांगणारे प्रेरणादायी व्याख्यान डॉ ऋजुता राजगुरू यांनी स्थानिक भागवत मंगल कार्यालयात लोकजागर मंचाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
लोकजागर मंच तेल्हारा च्या वतीने कचरा हा कचरा नसून संपत्ती आहे.तसेच उन्हाळी वर्गातील विद्यार्थ्यांकरीता आयोजित स्पर्धांचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकजागर चे पुरुषोत्तम आवारे, जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, जिल्हा कार्यध्यक्ष गोपाल जळमकर, हिवरखेड शहर अध्यक्ष महेंद्र कराळे, तेल्हारा तालुकाध्यक्ष अमोल जवंजाळ, शहर अध्यक्ष राजेश काटे, अकोट तालुकाध्यक्ष अनंत सपकाळ,शहराध्यक्ष सूरज शेंडोकार, महिला तालुका अध्यक्ष सुनीता काकड, जेष्ठ पत्रकार अशोक घाटे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ ऋजुता राजगुरू यांनी कचऱ्याचे महत्व विशद केल्यानंतर पुरुषोत्तम आवारे यांनी लोकजागर मंचाची आजपर्यंत वाटचाल व घेतलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.
दोन वर्षांपासून लोकजागर मंचच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानून भविष्यात अशाच प्रकारच्या रचनात्मक कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी व्यक्त केलि. तसेच हिवरखेड शहर अध्यक्ष महेंद्र कराळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आयोजित कार्यक्रमामध्ये उन्हाळी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता आयोजित विविध स्पर्धातील पुरस्कार व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यामध्ये इंग्रजी मध्ये प्रथम क्रमांक दर्शन भगेवार, द्वितीय रिद्धी भुतडा, तृतीय श्रेया डेरे यांनी पटकवले तर गणित विषयात प्रथम क्रमांक अमृता म्हसने, द्वितीय अश्विन कवाळे, तृतीय दर्शन भगेवार तसेच डान्स मध्ये प्रथम क्रमांक शशांक सोनिकर, द्वितीय भूषण वानखडे ,तृतीय श्रद्धा विंचूरकर यांनी पटकावले, संगीता मध्ये पियुष वडतकर,द्वितीय शेजल डांगे, तृतीय रिया यादव यांनी पटकावले यांना हर्षा तायडे, मयुरी राऊत, पियुष वडतकर, चंचल पाठक, विशाल जळमकर, वैष्णवी गायकवाड या शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनीता काकड यांनी केले. कार्यक्रमाला लोकजागर मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पालक, विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : दानापूर येथे झाले अनोखे वृक्षारोपण, ४०० विद्यार्थ्यांनी राबवला उपक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola