तेल्हारा (प्रतिनिधी) : ढोल तशांच्या गजरात कावड धारक शिवभक्तांनी केला शासन प्रशासनाचा निषेध
तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळणी व पडलेल्या मोठ मोठ्या खड्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाल्यामुळे शासन व प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवभक्तांसह नागरिकांनी आज 29 जुलैला तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्य पुतड्या पासून ते तहसील कार्यालय पर्यन्त ढोल ताशे, भजनाच्या गजरात भर पावसात कावड धारकांसह शिवभक्तांसाह नागरिकांनी भव्य मोर्चा काढून खड्डे बुजविण्याबाबत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. व कावड धारक शिवभक्तांनी दगड झालेल्या प्रशासन व शासनाचा प्रतिकात्मक दगडाला खड्ड्यातील पाण्याचा जलाभिषेक करून निषेध दर्शवला तसेच स्थानिक गौतमेश्वर मंदिर समोर पूल बाधण्याबाबत व रस्ता कंरण्याबाबत मुख्याधिकारी न.प. तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रावण महिन्या मध्ये तेल्हारा शहरासह तालुक्यातून तून मोठ्या प्रमाणात कावड धारक शिव भक्त तेल्हारा ते अंदुरा व तेल्हारा ते धारगड ला जात असतात परंतु सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्ये आहेत की खड्यांमध्ये रस्ता हे समजण्याच्या पलीकडे गेले असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या रस्तावर अनेक लहान मोठे अपघात झाले असून अनेक जन जखमी झाले तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. येत्या काही दिवासातच कावड यात्रेला सुरुवात होणार असून कावड धारक भाविक भक्ताना पूर्णा नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. सदर रस्त्यांवरील खाड्यामुळे अपघात किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळेस या रस्त्यांवरून कावड धारकांना कावड घेऊन चालणे शक्य नाही. या रस्त्याकडे या विभागातील लोकप्रतिनिधी, व संबधित अधिकारी यांचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. चाळणी झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी तसेच तेल्हारा येथील गौतमेश्वर मंदीरासमोरील गौतमा नदीवर पुलबांधून रस्ता करण्यात यावा या करिता तहसीलदार व मुख्याधिकारी न.प. तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यापूर्वी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतड्या जवळून ढोलताशे, भजन मंडळी कावड धारक शिवभक्तसह नागरिकांनी मुख्य मार्गाने शासन व प्रशासनप्रती खड्ड्या बाबत जाहीर निषेध करत घोषणा देत भव्य मोर्चा काढला. त्याचबरोबर कावड धारक शिवभक्तांनी दगड झालेल्या प्रशासन व शासनाचा प्रतिकात्मक दगडाला खड्ड्यातील पाण्याच्या जलाभिषेक करून निषेध केला. या शिवभक्तांच्या मोर्चाला जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांनी भेटी दिल्या यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, भरीप बहुजन महासंघचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे, कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रकाशराव वाकोडे व डा. अशोक बिहाडे, एकता मंडळाच्या वतीने गजानन गायकवाड, लोकजागर मंच वतीने चंद्र्कांत मोरे, गौतेमेश्वर संस्थान तर्फे राहुल मिटकारी, युवाक्रांति विकास मंच अध्यक्ष रामभाऊ फाटकार, शिवभक्तांच्या वतीने सचिन थाटेआदींनी मनोगत व्यक्त केले. आयोजित मोर्चा मध्ये स्थानिक कावड धारी शिव भक्त मंडळ, विविध मंडळे, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पाधिकारी सह कार्यकर्ते व नागरिक शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. थांनेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्थ चोख होता.
( कावड धारक शिवभक्तांनी दगड झालेल्या निगरगठ्ह प्रशासन व शासनाच्या प्रतिकात्मक दगडाला रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्याचा जलाभिषेक करून निषेध दर्शवला. अनेक वर्षांपासून झोपी गेलेल्या शासन व प्रशासनाला जागी करण्यासाठी शिव भक्तांना रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला )
( पाऊस उघडल्या नंतर रस्तावरील खड्डे त्वरित डांबरीकरनाने बुजवण्यात येतील.
संजय बोचे उपविभागीय अभियंता तेल्हारा )
( रस्तायांबाबत संबधित कंत्राटदार व बांधकाम विभागाला खड्डे बुजवण्याबबात तहसील दार यांच्या द्वारे निर्देश देण्यात येतील .. विजय सुरवळकर नायब तहसिलदार तेल्हारा )
अधिक वाचा : दानापूर येथे झाले अनोखे वृक्षारोपण, ४०० विद्यार्थ्यांनी राबवला उपक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola