तेल्हारा(प्रतिनिधी)- प्रत्येकाच्या घरात तयार होणारा ओला आणी सुका कचरा हा नुसता कचरा नसुन ती संपत्ती आहे,कचराचे असे महत्व सांगणारे प्रेरणादायी व्याख्यान उद्या तेल्हारा येथे आयोजित करण्यात आले आहे.लोकजागर मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.अकोट येथिल प्रसिध्द डॉक्टर स्त्री रोग तज्ञ रुजूता राजगुरु ह्या हे व्याख्यान देणार आहेत.लोकजागर मंच तेल्हारा तर्फे उद्या भागवत मंगल कार्यालय येथे दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.उन्हाळी वर्गातील विध्यार्थ्या करिता विविध स्पर्धांचा पूरस्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा या ठिकानी पार पडनार असून डॉक्टर राजगुरु यांचे व्याख्यान पार पडनार आहे.कचराचे महत्व सागंणारे हे व्याख्यान असून हा विषय प्रतेकाने एकावा असा आहे.लोकजागर मंचचे सस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडनाऱ्या समारंभाला जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार,हिवरखेड शहर अध्यक्ष महेंद्र कराळे,कार्याध्यक्ष गोपाल जळमकार,अकोट तालुका अध्यक्ष अनंत सपकाळ,सुरज शेड़ोकार,राजेश काटे,सुनिताताई काकड आदींची उपस्थिती राहणार आहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन लोकजागरमंच च्या वतीने करण्यात आले आहे.