* खड्डेमय रस्त्यांवरून कावड आणायची तरी कशी ?, शिवभक्तांचा लोकप्रतिनिधींना सवाल
तेल्हारा – तेल्हारा तालुक्यातीन खड्डेमय रस्त्यांसाठी सोमवार दि 29 जुलैला तेल्हारा येथील समस्त शिवभक्तांनाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे . तेल्हारा ते अंदुरा या कावड यात्रा मार्गावरील रस्त्यांवर वरील गडडे त्वरित बुजवण्यात यावेत ही मागणी शिवभक्तांच्या वतीने करण्यात येईल.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रावण महिन्या मध्ये तेल्हारा शहरासह तालुक्यातून तून मोठ्या प्रमाणात कावड धारक शिव भक्त तेल्हारा ते अंदुरा व तेल्हारा ते धारगड ला जात असतात परंतु सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्ये आहेत की खड्यांमध्ये रस्ता हे समजण्याच्या पलीकडे गेले असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे . यामुळे या रस्तावर अनेक लहान मोठे अपघात झाले असून अनेक जन जखमी झाले तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. येत्या काही दिवासातच कावड यात्रेला सुरुवात होणार असून कावड धारक भाविक भक्ताना पूर्णा नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. सदर रस्त्यांवरील खाड्यामुळे अपघात किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . रात्रीच्या वेळेस या रस्त्यांवरून कावड धारकांना कावड घेऊन चालणे शक्य नाही . या रस्त्याकडे या विभागातील लोकप्रतिनिधी , व संबधित अधिकारी यांचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे . या करिता कावड धारक शिवभक्तांसह नागरिकांसाठी कावड यात्रा मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबत सोमवार दि 29/07/2019 रोजी निवेदन देण्यात येत आहे . या निवेदनाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज पुतड्या पासून ते तहसील कार्यालय येथे पाई मार्गाने कावड धारकांसह शिव भक्त , नागरिक यांच्या हस्ते मा. तहसिलदार साहेब यांना निवेदन सादर करण्यात येणार अहे यामध्ये मोठ्या संख्येने कावड धारक , शिव भक्त , नागरिक यांनी उपस्थित राहावे असे अवाव्हान शिव भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.
.