अकोला (प्रतिनिधी) : आजारा होण्यापुर्वी किंवा प्राथमिक अवस्थेत आजाराचे निदान झाले तर त्वरीत योग्य उपचाराने रोग लवकर बरा होतो. देशात अनेक महिला स्तन कर्करोग ग्रस्त असुन जनजागृती नसल्यामुळे त्याचे रुग्ण वाढत आहे. या रोगाचे निदान करण्यासाठी ब्रेस्ट जॅकेट हा उत्तम उपाय आहे. या व अशा सर्व आरोग्याच्या सुविधा जनसामान्यापर्यंत पोहचविण्यास शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन केद्रींय मानव संसाधन, दुरसंचार, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.
भारत सरकारच्या इलेक्ट्रानिक्स व सुचना प्रोद्यागीक विभागाकडून महिलांच्या स्तन कर्करोगाच्या निदानासाठी विकसीत थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानावर आधारीत थर्मल प्रतिमा विशेष कॅमेरा असलेल्या ब्रेस्ट जॅकेटचे देशात प्रथमच लोकार्पण ना. संजय धोत्रे यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रूग्णालयात करण्यात आले.
यावेळी इलेक्ट्रानिक्स आणि सुचना प्रौद्योगीकी विभागाचे सचिव अजय प्रकाश सावनी, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, उपमहापौर वैशाली शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सी-मेट पुणेचे महासंचालक मुनीरत्नम, सी-मेट थिसुरचे संचालक डॉ. रघु, एनआयसीचे डॉ. अवनीश गुप्ता, मुराटा संस्थेचे व्यवस्थापीकीय संचालक राजेश मेनन, सी-मेट च्या वैज्ञानिक व नारी शक्ती अवार्ड प्राप्त् डॉ. ए. सीमा, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. फारूकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ब्रेस्ट जॅकेट हे स्तन कर्करोगाचे निदान करण्यासाठी सुलभ व सोपे उपकरण आहे. या उपकरणासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही. हे एक थर्मल जॅकेट असल्यामुळे स्त्रीयांना वापरण्यासाठी सोईचे असुन यामुळे शरीरातील तापमानाच्या वर आधारीत उपकरण असल्यामुळे फक्त् काही वेळा मध्ये शरीरातील थर्मल डाटाच्या आधारे एनालिसीस करून कर्करोगाचे निदान करण्यात येईल. भारत सरकारच्या इलेक्ट्रानिक्स आणि सुचना प्रौद्योगीक विभागातंर्गत कार्यरत असलेल्या सी-मेट या संस्थेव्दारे थर्मल ब्रेस्ट जॅकेटचे संशोधन करण्यात आले असुन सदर जॅकेट मेड-इन इंडिया कार्यक्रमातंर्गत मुराटा या जपानी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या करारानुसार याचे उत्पादन भारतात करण्यात येणार आहे. त्यानंतर ते देश विदेशात पाठविण्यात येणार आहे, हे उल्लेखनीय असल्याचे इलेक्ट्रानिक्स आणि सुचना प्रौद्योगीकी विभागाचे सचिव अजय प्रकाश सावनी यांनी सांगितले.
सदर उपकरण सी-मेट च्या वैज्ञानिक व नारी शक्ती अवार्ड प्राप्त् डॉ. ए. सीमा यांनी मलबार कर्करोग संस्था येथील डॉक्टरांच्या सहकार्यांनी विकसीत केले आहे. यावेळी सी-मेट पुणेचे महासंचालक मुनीरत्नम, सी-मेट थिसुरचे संचालक डॉ. रघु, एनआयसीचे डॉ. अवनीश गुप्ता, मुराटा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मेनन, सी-मेट च्या वैज्ञानिक व नारी शक्ती अवार्ड प्राप्त् डॉ. ए. सीमा यांनी आपले विचार प्रगट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. फारूकी तर उपस्थितांचे आभार डॉ. आरती कुलवाल यांनी मानले.जिल्हा स्त्री रूग्णालय येथे स्तन कर्करोगापासुन मुक्ती मिळावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या पुढाकाराने 27 ते 29 जुलै या कालावधीत स्तन कर्करोग रूग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीराचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक वाचा : बाळापूर येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola