तेल्हारा(प्रतिनिधी)- आज दुपारी अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात आरोपीसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आज सायंकाळी स्थानिक आठवडी बाजार जवळील गौतमा नदीच्या काठावर पोहरकर यांच्या शेताजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला कळाली त्यावरून सापळा रचून सदर ठिकाणी धाड टाकली असता जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये १)सैफउल्ला खाँ ऐसान खाँ रा.पंचगव्हान,२)शे जमीर शे बिलन रा तेल्हारा,३)भास्कर श्रीराम वाघ रा.वाडी अदमपूर,४)अब्रार हुसेन शे अब्बास रा तेल्हारा,५)गणेश प्रल्हाद सरोदे रा तेल्हारा,६)सुनील पंढरी मोहोरे रा तेल्हारा,७)कैलास कौतीकराव खारोडे रा तेल्हारा यांना रंगेहाथ जुगार खेळतांना अटक करून त्यांच्या कडून नगद १६ हजार ५५० रुपये व दोन मोटारसायकल किंमत ५० हजार असा ऐकून ६६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सातही आरोपींविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम १२ जुगार अक्ट नुसार कारवाई करून अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ अनिल लापूरकर,राजेश्वर सोनोने,हर्षल देशमुख,राजू इंगळे,भरतसिंग ठाकूर यांनी केली.सदर कारवाईमुळे अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले असून गेल्या काही महिन्यातील जुगारावर दुसरी मोठी कारवाई आहे.