अकोट(देवानंद खिरकर) : तालुक्यातील मुंडगाव परिसरातील लोहारी या मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून बिकट अवस्था झाली असून, या मार्गावर मोठया प्रमाणात खडयाचे साम्राज्य निर्माण झाले असून सदरील मार्ग हा लवकरात लवकर दुरूस्त करण्याची मागणी परिसरातील वाहनधारकासह ग्रामस्थांतून होत आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव लोहारी या रस्त्याची पार दुरवस्था झाली असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी नागरिकां मधून जोर धरत आहे.मुंडगाव लोहारी हा मार्ग पूर्ण उखडून गेला आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडून त्यामधून वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ तथा वाहनधारकांकडून होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून या मार्गावर असणारया खडयामध्ये पाणी भरत असते. यामुळे त्या खड्यांची खोली लक्षात न येता वाहनधारक आपले वाहन सावरत नेत असताना जर खडयात गेले तर पडल्या शिवाय राहत नाहीत यामुळे या मार्गावर जिवीत हानी होइल याची शाश्र्वती देता येत नाही. या कारणामुळे या मार्गाची लवकरात लवकर दुरूस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.
अधिक वाचा : अकोला : लाच घेणाऱ्या रोजगार सेवकाला अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola