अकोला : 500 रूपयांची लाच घेणाऱ्या एका रोजगार सेवकाला अकोला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या मजुरांनी घरांचे बांधकाम करताना मजुरी केली त्यांचे दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी रोजगार सेवकाने 500 रूपयांची मागणी केली होती. ही कारवाई मूर्तिजापूर येथील एका चहा टपरीमध्ये करण्यात आली.
तक्रारदाराला रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळाले होते. रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या मजुरांनी या घराचे बांधकाम करताना मजुरी केली, त्यांचे दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी जनार्दन जयराम ढोरे (रोजगार सेवक, ग्रामपंचायत समशेरपूर), याने तक्रारदाराकडे 500 रुपयांची मागणी केली होती. ही मागणी मान्य नसल्याने तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी मंगळवारी करण्यात आली. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडील रक्कम आरोपी जनार्दन ढोरे यांनी स्वीकारली. दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आरोपीस रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एसीबीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : शेतकऱ्यांसाठी हायटेक यंत्रणा, लाडेगाव येथे ड्रोन द्वारे फवारणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola