अकोट (देवानंद खिरकर) : अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार हे मोठे गाव असुन बरेच वेवसाईक या बाजार पेठेत आपली दुकाने चालवतात मात्र गेल्या काही दिवसापासून चोहोट्टा येथे चोरीचे सत्र सुरु आहे.
आधी चोरांनी चोहोट्टा पोलीस चौकीसमोर असलेले सोण्याचे दोन दुकाने मध्ये धाडसी चोरी करुन व दुकाने फोडुन मुद्दे माल लपास केला होता मात्र त्या चोरांचा अजुनही तपास लागलेला नाही व काल रात्री सुध्दा या ठिकाणी दोन दुकानाचे शेटर फोडण्याचा प्रयत्न झाला. या मध्ये चोहोट्टा येथील दुकान मालक शेख गुफुर यांच्या दुकानाचे शेटर तोडुन गल्यातील एक हजार रूपये चोरांनी लपास केले व नंतर येथील दुसरे दुकान मालक रामनीवास राठी यांच्या दुकानाचे सुध्दा शेटर फोडले हे सकाळी दुकानात आल्यानंतर त्याना दिसले कि आपल्या दुकानात चोरी चा प्रयत्न करण्यात आला आहे त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली पोलीसांनी घटणेचा पंचनामा करुन अज्ञात चोरा विरुध्द दहीहांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे करीत आहेत.
अधिक वाचा : तेल्हारा बसस्थानक टाकीतील दूषित पाण्यासंदर्भात युवासेना आक्रमक, बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola