अडगाव बु (दीपक रेळे) : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे या करिता प्रतिबंधित HT Bt या वाणाची जाहीर करून प्रतिकात्मक लागवड केल्यामुळे प्रशासनाने सोळा भूमीपुत्रावर गुन्हे दाखल करण्यात आले. शेतकाऱ्या करिता लढणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची दखल व त्यांनी पत्कारलेला धोका लक्षात घेऊन यांना न्याय प्राप्त व्हावा या करिता अडगाव बु शिवाजी नगर नागरी सत्कार समिती तर्फे सत्काराचे आयोजन ग्रामपंचायत परिसरात करण्यात आलेले होते. HT Bt तंत्रज्ञान कपाशी च्या वाणाची लागवड केल्यामुळे या भूमीपुत्रावर जे गुन्हे दाखल केले हे गंभीर स्वरूपाचे असून यात एक लाख रुपये दंड व पाच वर्षे कारावासाची शिक्षा आहे.
कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित पाटील बाहाळे. शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर, तेल्हारा तालुका युवा आघाडी निलेश नेमाडे जेष्ठ नेते विनोद मोहकार, सतीश सरोदे, अमोल मसुरकर, गोपाल निमकर्डे, दिनेश गिर्हे, मोहन खिरोडकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अडगाव बु येथील गटनेते अशोक घाटे यांनी केले. या वेळी सकारत्मक गोष्टी प्रत्येकाने स्वीकारायला हवी आणि शेतकाऱ्या करिता शासनाने केलेल्या उपाय योजना हया कुचकामी ठरत आहेत गुन्हे दाखल झालेल्या सोळा भूमीपुत्रा पैकी अडगाव बु व शिवाजीनगर येथील सहा भूमिपुत्र आहेत ही गौरवाची बाब आहे. असं मत मांडले. जिल्हापरिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी समाजात दुर्बल घटक हा शेतकरी राहिला असून याला हक्क व न्याय प्राप्त करून देण्याकरिता जे भूमिपुत्र या करिता संघर्ष व लढा देत असतील राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांनी त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणे आवश्यक आहे. अस मत वक्त केले. शेतकरी संघटनेचे माहिती व तंत्रज्ञान आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी शेती करणे सुलभ व्हावे, शेती गुणवत्तापूर्ण उत्पादक व्हावी या करिता तंत्रज्ञान ची गरज आहे. शेतकऱ्यांना सुखा आणि सन्मानाने जगण्याकरिता तंत्रज्ञान व बाजारपेठ चे स्वतंत्र हा शेतकऱ्यांचा हक्क मिळवून घेणे आवश्यक आहे. अस मत वक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती ललित पाटील बाहाळे हे होते. ते या प्रसंगी बोलताना जैवतंत्रज्ञान संमधीत सर्व पुरावे सत्तेत असलेल्या सर्व जेष्ठ मंत्री महोदयाना दिल्ली येथे देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु समाजामध्ये जैविक शेती चा आग्रह धरणारे लोकच जैव तंत्रज्ञानाला विरोध करीत आहेत. ही दुःखद पूर्ण बाब आहे. कोणतेही तंत्रज्ञान हे चुकीचे नसून आपण त्याचा वापर कसा व किती करतो यावर ते अवलंबून आहे. देशातील शेतकऱ्यांना जगातील शेतकऱ्यासोबत स्पर्धा करण्याकरिता हे तंत्रज्ञान मिळणे आवश्यक आहे असं मत त्यांनी वक्त केले.
कार्यक्रमाच्याअध्यक्षपदी कृषिमित्र मनोहलालजी फाफट हे होते. अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना शेतकऱ्यांची एक अडचण समोर येते पण तिचे निवारण व्हायच्या आधी दुसरी अडचण उभी राहते. कर्जमाफी चा प्रश्न अजून पूर्ण निकाली निघालेला नाही. अडगाव बु येथील शेतकरी आजही कर्जमाफी पासून वंचित आहेत. पीक विमा चा प्रश्न हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे. शेतकऱ्यांना न्याय व हक्क मिळवण्याकरिता सर्व स्थरातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष करणे काळजी गरज आहे. या वेळी गावाचे सरपंच रुख्मिनीताई डाबेराव, उप सरपंच माहेबूब खा पठाण, पंचायत समिती सदस्य गुलाबीसींग डाबेराव, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, संजय शंकर ढोकणे, सौ. किरण कौठकर, सौ.आशा नेमाडे, अनिल मानकर, गोपाल चांडक, महेश उमाळे, जाफर खा, शरद चतारे, मकसूद मुल्लाजी, शे. जमीर, राजेंद्र कौठकर ग्रामपंचायत अडगाव बु चे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola