तेल्हारा (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 2 ऑगस्टला निवडणूक होणार आहे.
या मध्ये सभापती पदासाठी पुरुषोत्तम पाथ्रीकर प्रबळ दावेदार असल्याचे समजते तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सहकार, शेतकरी पँनलची सत्ता असून अडीच वर्षा नंतर ठरल्या प्रमाणे सहकार नेते सुरेश दादा तराळे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्याने तसेच बरींगे यांनी सुध्दा उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी 2 ऑगस्टला निवडणूक होणार आहे.
सत्ताधारी शेतकरी, सहकारी पँनल जवळ पुरेशे बहुमत असल्यामुळे पदासाठी फारशी चढावढ होणार नाही प्राप्त माहितीनुसार सभापती पद शेतकरी पँनल कडे तर उपसभापती पद सहकार प्यानल कडे जाणार आहे 2 ऑगस्टला होणाऱ्या निवडणूकी मध्ये सभापती पदा साठी पुरुषोत्तम पाथ्रीकर प्रबळ दावेदार असल्याचे समजते परंतु निवडणुकी मध्ये वेळेवर काय समीकरणे घडतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे 2 ऑगस्टला सकाळी 11:45 वा. पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक अविरोध होण्याची शक्यता सुध्दा वर्तविली जात आहे.
अधिक वाचा : रिपब्लिकन विद्यार्थी सेना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती अक्षय दांडगे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola