अकोला : शहरातील गीतानगर भागातील आशिर्वाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यानी हात साफ केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एक ०९ एमएम पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसासह ६० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
राजेश नानाजी जोशी, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. राजेश जोशी हे अकोला पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने ते रात्री रुग्णालयात होते. दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजता घरी आले असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. कपाटातील ६० हजार किमतीचे दागिने आणि एक सरकारी ०९ एमएम पिस्तूलासह १० जिवंत काडतुसे चोरट्यांनी लंपास केली.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर उपविभागीय पोलीस अधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्यासह जुने शहर पोलीस अधिकारी आणि तपास वाहन, ठसे तज्ञ, श्वान पथक हे सर्वजण जोशी यांच्या घरी दाखल झाले. जुने शहर पोलीस ठाण्यात भादंवि ४७७, ३८०, या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस विभागालाच चोरट्यांनी आव्हान दिले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी पीएसआय जोशी यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola