अकोट (देवानंद खिरकर)=आज अकोट शहराकडे गोवंश जातीची जनावरे काही ईसंम कत्तली करिता अत्यंत क्रुरतेने नायलान दोराने एकमेकांना बांधून रोडने पायी हाकलत आणत आहेत.अशा बातमी वरुन माऊली धाबा अकोट येथे थांबून दिसले वरुन आम्ही सदर गोवंशाच्या मालकी हक्का बाबत विचारपूस दरम्यान सदर गोवंश हे कत्तल करण्याच्या ऊद्देशाने अकोट येथे नेत असल्याचे संगीतले ,तसेच मालकी हक्का बाबत कोणतेही वैध दस्तावेज पोलिसांन समोर हजर केले नाहित.वरुन 68 गोवंश जातीची जनावरे बैल किंमत अंदाजे 14,70,000 रुपयचा मुद्देमाल घटनास्थळा वरुन ताब्यात घेतला.व सोबतचे पोलिस स्टाफ चा मदतीने जप्त मुद्देमाल पो. स्टे.ला आनून त्याची पशुवैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत तपासणी करुन पो.स्टे.ला त्यांच्या संगोपनाची व्यवसस्था नसल्याने जप्त गोवंश बैल अकोट गोरक्षण सेवा समिती अकोट यांच्या ताब्यात दिले आहे.तरी यातील आरोपी सै.जमीर सै.मुस्ताक वय 25 वर्ष रा.रामटेक पुरा अकोट ,अहेमद खा मुक्तार खा वय 32 वर्ष रा.याकुब पुरा अकोट, अमजद खा बरकत खा वय 33 वर्ष रा.अकबरी प्लाट अकोट,सै अस्पाक सै सिकंदर वय 53 वर्ष रा.रामटेक पुरा अकोट व ईतर घटनास्थळा वरुन पळून गेलेले अंदाजे दहा इसम यांनी सदरचे जनावरे हे अकोट शहराकडे पायी हाकलत एकमेकांना अत्यंत निर्दयतेने नायलान दोराने बांधून कत्तल करण्याच्या ऊदेशाने मिळुन आल्याने आरोपीचे हे सदर कृत्य हे प्राणी स्वरक्षन अधिनियंम कायदा 1995 कलम 5, 5 अ 5, ब 9 सहकलम प्राण्यांना क्रूरतेने वागविनन्यास प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 च, ज, झ ,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.वरिल नमुद कार्यवाही पोलिस निरिशक संतोष महल्ले ,पोलिस उप निरिशक रनजितसिह ठाकूर,पो.हे.का.उमेश सोळंके,संजय घायल,ना.पो.का.गोपाल अघडते,पो.का.गोपाल बुंदे,अन्कुश डोबाळे,मनिष कुलट,विठ्ठल चव्हाण,विजय सोळंके,अहमद पठाण यांनी केली.