हिवरखेड (दिपक रेळे) : हिवरखेड या गावातील डॉक्टर हजर नसल्याने पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सविस्तर असे की सरकारी दवाखान्याजवळच राहत असलेल्या यशोदाबाई रमेश पटवे ह्या दिनांक 17 जुलै बुधवार रोजी रात्री आपल्या घरी झोपलेली ह्या दिनांक 17 जुलै बुधवार रोजी रात्री आपल्या घरी झोपलेल्या असताना 18 जुलै च्या पहाटे एक ते दोन च्या दरम्यान सापाने त्यांच्या खांद्यावर झोपेतच चावा घेतला. सापाने जोरदार दंश केल्याने यशोदाबाईंना तीव्र वेदना झाल्याने त्या खडबडून जाग्या झाल्या. पाहतात तर काय चक्क नागराज त्यांच्या अंगावर बसलेले होते ते पाहताच त्या प्रचंड भांबावल्या आणि सापाला बाजूला करण्याचा प्रयत्न करताच सापाने पुन्हा एकदा त्यांच्या पोटावर दंश केला. त्यामुळे त्यांनी प्रचंड आरडाओरड केला. त्यांचा आरडाओरडा एकताच घरातील इतर सदस्यांना जाग आली. तात्काळ सापाला बाहेर करून घरातील सदस्यांनी यशोदा बाईंना हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना तेल्हारा येथे जाण्याचा सल्ला दिला. परंतु यशोदाबाईची प्रकृती गंभीर झाल्याने आणि हिवरखेड तेल्हारा राज्यमार्ग अत्यंत खराब असल्याने तेल्हारा पोहोचण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आरोग्य सभापती जमिरुल्ला खान पठाण यांच्या गावातच रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेक मृत्यू ओढवत आहेत. त्यामुळे इतर ठिकाणचा विचार न केलेलाच बरा अशी परिस्थिती आहे.
काही दिवसाआधीच वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे सौ शीला वाकोडे या महिला एसटी वाहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार इत्यादी अनेक मोठ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून योग्य दिशा निर्देश दिले होते परंतु येथील परिस्थिती अजूनही जैसे थे असून कोलमडलेली आरोग्य सेवा आणि प्रमुख रस्त्यांची झालेली प्रचंड दुरावस्था हेच नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
अन्य एका घटनेत सौंदळा येथील प्रतिष्ठित नागरिक व भाजपा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ संजय शर्मा यांचे मोठे वडील डॉ नारायणजी शर्मा यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने अकोट येथे नेत असताना त्यांचाही वारखेड हिवरखेड अकोट ह्या राज्यमार्गाच्या दूरावस्थेमुळे पोहोचण्यास उशीर झाल्याने रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.
तीन दिवस आधी ज्ञानदेव भड यांना हिवरखेड येथून अकोला उपचारार्थ नेताना त्यांचाही रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला होता.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा ढेपाळलेला कारभार, डॉक्टरांची कमतरता आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे वर्षानुवर्षापासून रस्त्यांची होत असलेली दुर्गती या बाबी रुग्णांच्या मृत्यू संख्या वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
प्रतिक्रिया
आईला रात्री सर्पदंश झाल्यानंतर सरकारी दवाखान्यात डॉक्टर हजर नव्हते, 108 रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. तसेच तेल्हारा नेताना रस्ते खराब असल्यामुळे पोहोचण्यास बराच उशीर झाला त्यामुळे रस्त्यातच प्राणज्योत मावळली.. आईचा मृत्यू उपरोक्त सर्व बाबी कारणीभूत असल्याचे दिसते.
दीपक रमेश पटवे (मृतक महिलेचा मुलगा)
अधिक वाचा :अकोला : शेतकऱ्यांना दिलासा , अकोल्यात पंधरा दिवसानंतर पावसाची हजेरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola