अकोला : श्रावण महिन्यात अकोल्यामध्ये कावड महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या महोत्सवानिमित्त राजराजेश्वर भक्त वीस किलोमीटर अनवाणी पायाने चालून गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील पाणी आणून राजराजेश्वर मंदिरात वाहतात. मात्र, ते ज्या मार्गाने प्रवास करतात त्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. परिणामी, कावड धारकांचा हा प्रवास गेल्या तीन वर्षांपासून खडतर झाला आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटी करणाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने कावड धारक प्रशासनाप्रती संताप व्यक्त करत आहेत.
अकोला-अकोट रस्त्याच्या सीमेंट-काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे. गिट्टी, मुरूम आणि खडी रस्त्यावरच्या खड्ड्यात टाकण्यात आला आहे. या साहित्यांची दबाई आणि त्यावर सिमेंटचे बांधकाम न झाल्यामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी जिकिरीचा ठरला आहे. या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहे. अनेकांनी या खराब रस्त्यामुळे आपला जीव गमावला आहे. तरीही लोकप्रतिनिधी व प्रशासन या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी कुठलाही विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत.
या रस्त्यावर दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी अकोल्यातील कावड धारक गांधीग्राम येथे 20 किलोमीटर अनवाणी पायाने जातात. गांधीग्रामच्या पूर्णा नदीतील पात्रातून पाणी घेऊन हे कावडधारक रात्रभर प्रवास करत परत येतात. या पाण्याने ते राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. या रस्त्याचे काम श्रावण महिन्याच्या आत पूर्ण व्हावे यासाठी कावट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
अधिक वाचा : वंचीत आघाडी मध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी, १२३ उमेदवारांनी दिल्या मुलाखती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola