अकोला (प्रतिनिधी) : अकोल्यात सुरुवातीपासूनच दर्जेदार साहित्य निर्मिती होत आली आहे. हीच परंपरा साहित्यिकांनी कायम ठेवली असून, यावर्षी जिल्ह्यातील साहित्यिकांचे साहित्य पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बालभारती व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
किशोर बळी
या आधी प्रसिध्द कवी किशोर बळी यांच्या ‘प्रभात’ या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इंग्रजी आणइ हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘सुलभभारती’ या मराठीच्या पाठ्यपुस्तकात या कवितेची निवड केली आहे.
ॲड.अनंत खेळकर
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बीकॉम तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी ॲड.अनंत खेळकर यांच्या ‘निर्धार’ ह्या कवितेचा सामावेश करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम अवारे
पुरुषोत्तम अवारे ‘मानियले नाही बहुमता’ या पुस्तकाची दखल घेत ‘अंधश्रध्दा विनाशाय’ या वैचारीक लेखाचा समावेश बीकॉमच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
प्रा.दिवाकर सदांशिव
प्रा.दिवाकर सदांशिव यांच्या ‘सटवाई’ या कथासंग्राहातील ‘ठकन’ ही कथा बीकॉमच्या तृतीय वर्षाच्या ‘आशय’ या पुस्तकात समाविष्ट असून यामध्ये भारतीय ग्रामीण संस्कृती कशी मोडकळीस येत आहे, याचे वर्णन आहे.
अशोक इंगळे
प्रा. डॉ. अशोक इंगळे यांच्या ‘युद्घपक्षी’ या कवितासंग्रहातील ‘माणसं!’ ही कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी. काँम. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
रवींद्र महल्ले
अकोला शहरातील कवी रवींद्र महल्ले यांच्या ‘धोंडी धोंडी पाणी दे’ या काव्यसंग्राहातील ‘धोंडी धोंडी पाणी दे’ हीच कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बीकॉम तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
अधिक वाचा : महाविद्यालयीन खुल्या निवडणुकांमध्ये विद्यार्थी उमेदवारांचे चरित्र्य प्रमाणपत्राची सक्ती करा – अंकुश गावंडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
आमच्या विजू पाटलाच नाव च नाही
आबा