अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर साहेब यांची अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेऊन विद्यार्थी हिताच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन दिले. त्यामध्ये प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया चालु झाले असुन त्यामधील ग्रामिण भागातील बरेच विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शहरात येतात व विविध शाखेकरीता प्रवेश घेण्यास तप्तर असतात परंतु सध्या स्थिती लक्षात घेता अकोला शहरातील बऱ्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश क्षमता पुर्ण झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशापासुन वंचित राहवे लागत आहे व बिएससी, बिकाॅम, बीए यासह विविध शाखेतील अभ्यासक्रमाकरीता शहरातील बस स्थानक व रेल्वे स्टेशन जवळ असलेले सिताबाई कला महाविद्यालय, रालतो विज्ञान महाविद्यालय, लरातो वाणिज्य महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, पातुर येथील डॉ. एच एन सिन्हा महाविद्यालय यांच्यासह बऱ्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन येण्याजाण्याच्या सोयीनुसार वरील महाविद्यालयात १०% टक्के जागा तात्काळ वाढविण्यासंदर्भात संबंधीत महाविद्यालयांना आदेश देण्यात यावे व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे.
तसेच आगामी महाविद्यालयाच्या निवडणुकामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निवडणुक समितीमध्ये विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना प्राधान्य देण्यात यावे. वरिल सर्व मागण्या तात्काळ काढण्यात यावे असे कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात कळविण्यात आले. निवेदनात केलेल्या मागण्या ताक्ताळ पुर्ण न केल्यास सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.यावेळी विद्यार्थी नेते अमोल शिरसाठ, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे अकोला जिल्हा संघटक आकाश हिवराळे, दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश इंगळे, सम्यकचे महानगराध्यक्ष आकाश गवई, धिरज इंगळे, महासचिव पवन गवई, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महानगराध्यक्ष शैलेश बोदडे, रिपब्लीकन विद्यार्थी सेनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष अक्षय दांडगे, रवि अवचार यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : कुणबी समाजातर्फे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola