अकोला : जिल्ह्यात या महिन्यातही पावसाने दडी मारल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पाण्यासाठी देवाला साकडं घालत ‘धोंडी धोंडी पाणी दे, धोंडीच हिवश पाणी मोठं पिवस, उंचकाला बेडका पाणी उला…’ असे गाणे म्हणत आणि हलगीच्या तालावर गावातील शेतकरी घरोघरी जात आहेत.
जून महिन्यात अकोल्यात अल्प पाऊस झाला. यावेळी शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणं विकत घेऊन झपाट्याने पेरणी उरलकली. मात्र, आता पाऊस न झाल्याने दुबार पेरणीच संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं असताना तीही करण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. म्हणूनच इथला शेतकरी वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी शरीराला कडूलिंबाचा पाला बांधून आणि लाकडी ओंढक्याला बेडकाला टांगून गावकरी गाणीगात धोंडी काढतात. गावातील महिला धोंडी काढणाऱ्या पुरुष आणि बेडकावर पाणी टाकून पूजा करतात. धोंडी काढल्याने पाऊस येईल, अशी धारणा असल्याने ही परंपरा अजूनही कायम आहे. त्यामुळे वेधशाळेचे अंदाजही धोंडी काढल्यानंतर खोटे ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या धोंडीची पूजा फक्त हिंदू धर्मासाठी नाही. मुस्लिम बांधवही वरून राजा प्रसन्न व्हावा यासाठी या धोंडीची पूजा करतात. समाधानकार पाऊस होऊन सर्वच जाती धर्मातील शेतकऱ्यांची चिंता मिटावी, अशी प्रार्थना वरुण राजाकडे केली आहे.
अधिक वाचा : अकोला : वीजचोरट्यांना दणका ; महावितरणकडून एरिअल केबलिंगच्या उपाययोजना
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola