अकोला : शहरातील काही भागात होणारी मोठ्या प्रमाणातील वीजचोरी ही गंभीर समस्या आहे. यावर कायमचा अंकुश लावण्याचे काम सध्या महावितरणने हाती घेतले आहे. याअंतर्गत सर्वाधिक वीजचोरी होणाऱ्या शहरातील ११ फिडरवर एरिअल केबलिंग करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज चोरीला आळा बसणार आहे. महावितरणाच्या ७० फिडरद्वारे शहराला वीजपुरवठा केला जातो. यात जुन्या शहरातील शिवसेना वसाहत, अकोटफैल, खदान भाग, डाबकी रोड परिसरातील ११ फिडरवरून सर्वाधिक वीजचोरी होते. या फिडरला पुरवठा होणाऱ्या वीजेपैकी ७० टक्के वीज अनधिकृतरित्या वापरली जाते. याचा भार महावितरण व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रामाणिक ग्राहकांवर पडतो. यापूर्वी देखील या भागात वीजचोरी रोखण्यासाठी विविध संकल्पना आखण्यात आल्या, पण त्या यशस्वी ठरू शकल्या नाहीत.
नुकतेच महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून राज्यभरातील परिमंडळांना सर्वाधिक वीजचोरी होणाऱ्या फिडरची माहिती मागविण्यात आली होती. या माहितीच्या आधारे उपाय म्हणून केबलिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही योजना राबविण्यासाठी अकोला परिमंडळाला १७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ज्याद्वारे सर्वप्रथम जुन्या शहरातील वसाहतींमध्ये ओपन वीजेच्या तारा काढून नवीन केबल टाकण्याचे काम मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या मार्गदर्शनात जलद गतीने होत आहे. मुख्य म्हणजे, अकोटफैलमध्ये ज्या दिवशी केबलिंगचे काम झाले, त्या दिवशी अर्ध्यापेक्षा जास्त घरात अंधार पसरला होता, अशी माहिती आहे. केबलिंग म्हणजे काय ? नवीन प्रकारातील वीज केबल ह्या कोटेड आहेत. या तारांवर आकडे टाकून वीज चोरता येणार नाही. शिवाय केबलला ठिकठिकाणी एक्सटेक्शन बॉक्स आहेत. एका एक्सटेक्शन बॉक्सवरून ९ ग्राहकांचे कनेक्शन आहे. त्यामुळे अनधिकृत कनेक्शनची माहिती त्वरित संबंधित विभागाला कळेल.
अपघाताचे प्रमाण घटणार -उघड्या वीज तारांमुळे अपघात होतात. पावसाळ्यात या अपघातांचे प्रमाण अधिक असते. यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने कोटेड केबल महत्त्वाचे ठरणार आहेत. शहरातील ३० टक्के भागात सध्या केबलिंगची कामे केले जात आहेत. यामुळे या भागात पुढे वीजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.
अधिक वाचा : आयटीआय अप्रेंटशीप तसेच कंत्राटी कामगार सेवा विचारात घेऊन ज्येष्ठतेनुसार महावितरण भरतीत प्राधान्य द्या- म.रा.बेरोजगार अप्रेंटशीप कृती समितीची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola