अकोला (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य बेरोजगार अप्रेंटशीप कृती समिती अकोला जिल्हा यांच्या वतीने राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एका निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की महावितरण कंपनीतर्फे जाहिरात क्रमांक चार पब्लिक 2019 विद्युत सहाय्यक तसेच पाच ऑब्लिक 2019 विद्युत उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .
या भरती प्रक्रियेमध्ये तसेच कंत्राटी कामगार व ज्येष्ठ ज्येष्ठतेनुसार वयाचा विचार कंपनीने करावा शासकीय नियमानुसार वय वाढवावे व आयटीआय अप्रेंटीशीप तसेच कंत्राटी कामगार हे रोजगारापासून वंचित होऊ नये म्हणून आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हा बेरोजगारांना योग्य तो न्याय द्यावा अशा मागणीसह एसएससी टक्केवारीवर भरती प्रक्रिया घेत असाल तर आयटीआय अप्रेंटीशीप कशासाठी करावी आयटीआय अप्रेंटीशीप च्या गुणावर भरती घ्यावी, वयोमर्यादा शासकीय नियमानुसार करावी, कंत्राटी कामगारांना प्राध्यान्य देण्यात यावे.
विद्युत सहाय्यक सहाय्यक व विद्युत उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी सरळ सेवा भरती घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य बेरोजगार अप्रेंशिप कृती समिती ने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म.रा.यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करून प्रतिलिपी संजयजी धोत्रे, मानव संसाधन विकास मानव संसाधन विकास संचार व इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रयोगिक पद्धती राज्य मंत्री भारत सरकार, डॉक्टर रणजीत पाटील गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला जिल्हा, व्यवस्थापकीय संचालक महावितरण याना एका निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बोदडे, संतोष वानखडे, विनोद कुकडे, सागर ढोले, अतुल बाळापुरे यांनी केली आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्र नवनिर्माण गोंधळी समाजाच्या वतीने अंबिका माताची काढली भव्यदिव्य मिरवणूक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola