• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुंबई – शेतकरी प्रश्नावर सेना आक्रमक ; पीक विम्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर, कंपन्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

adil by adil
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
मुंबई – शेतकरी प्रश्नावर सेना आक्रमक ; पीक विम्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर, कंपन्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम
11
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : मुंबई – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विमा कंपन्यांच्याविरोधात शिवसेनेच्या वतीने आज मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक विषय घेऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आज रस्त्यावर उतरले होते. ‘भारती एक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी 15 दिवसात कर्जमाफीचे, पीक विम्यांचे सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा अल्टिमेटम बँकांना व पीक विमा कंपन्यांना दिला. तसेच ज्यांचे अन्न खातो त्याला जागतो, असे म्हणत शिवसेना शेतकऱयांसोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे –

पीक विम्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे रस्त्यावर

15 दिवसात कर्जमाफीची प्रकरणे मार्गी लावा

मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बांधील

ज्यांचे अन्न खातोय त्याला आम्ही जागतोय

शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक – उद्धव ठाकरे

सर्व शेतकऱ्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि स्वाभिमानाला मानवंदना देण्यासाठी हा मोर्चा आहे. भारतीय सैन्यात लढणारी, शहीद होणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. बहुसंख्य जवानांचे माता-पिता हे शेतावर राबणारे आहेत. जवान निवृत्त होऊन खेड्यात जातो तेव्हा तो काळ्या आईच्या कुशीत विसावतो. आधी तो भारतमातेची सेवा करतो व शेवटी काळ्या आईची सेवा करतो. पण शेतकरी आणि जवानांच्या राष्ट्रसेवेची आपण काय कदर करतो? असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशासाठी चिंतेचा विषय

सीमेवरील जवानांचे हौतात्म्य व शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशासाठी चिंतेचा विषय ठरत नसून राजकारणाचा विषय ठरतो, याचे आम्हाला दुःख वाटते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख, दैन्य अस्वस्थ करणारे आहे. कापूस, हरभरा, ज्वारी, बाजरी, दूध, भाज्या, फळबागा, ऊस, द्राक्ष, डाळिंबाची उभी पिके कधी करपून जात आहेत, तर कधी गारपिटीत आडवी होत आहेत. पण शेतकऱ्यांचा आक्रोश कधी मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचला आहे काय ? महाराष्ट्राचे काम ज्या मुंबईतून हलवले जाते त्या मुंबईवर सगळ्यात जास्त अधिकार राज्यातील शेतकऱ्यांचाच आहे. महाराष्ट्र अखंड राहावा, मुंबई महाराष्ट्राची राजधानी राहावी यासाठी झालेल्या प्रत्येक लढ्यात महाराष्ट्राचा शेतकरी आघाडीवर राहिला, त्याने प्राण गमावला, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, अश्रुधुरांच्या नळकांड्या पचवल्या. तरीही ‘मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणा देत, शिवरायांचा भगवा खांद्यावर घेऊन तो लढत राहिल्याचे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेली पहायला मिळत आहे. याविषयांना घेऊन आज मुंबईत शिवसेनेकडून भव्या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा : अवर अकोला न्युज इम्पॅक्ट – गाडेगाव ग्राम पंचायत ने केली पाईपलाईन ची दुरुस्ती

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newsअकोला
Previous Post

अवर अकोला न्युज इम्पॅक्ट – गाडेगाव ग्राम पंचायत ने केली पाईपलाईन ची दुरुस्ती

Next Post

गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात

गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात

मिशा कापल्या म्हणून हेअर सलून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, नागपूर जिल्ह्यातील घटना

मिशा कापल्या म्हणून हेअर सलून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, नागपूर जिल्ह्यातील घटना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.