तेल्हारा (प्रतिनिधी) : गाडेगाव ग्राम पंचायत चा भोंगळ कारभार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ या मथळ्याखाली काल बातमी प्रकाशित होताच ग्राम पंचायत प्रशासनाने दखल घेत तात्काळ पाईपलाईन चे काम करून होणारा दूषित पाणीपुरवठा बंद केला.
तालुक्यातील गाडेगाव ग्राम पंचायत राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाते मात्र ग्राम पंचायत प्रशासनाचा कारभार बघता नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कारण निवडणुकी नंतर काही दिवसात राजकारण होऊन सदस्यांमध्ये फूट पडली. यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास होत असल्याने वॉर्ड क्रमांक दोन मधील काही नागरिकांच्या घरी पिण्याच्या पाण्याच्या नळातून शौचालयाचे पाणी येत असल्याने सदर नागरिकांनी याबाबत ग्राम पंचायत प्रशासन व सदस्यांना तक्रार दिली होती मात्र त्यांच्या तक्रारींना योग्य तो पाठपुरावा मिळाला नसल्याने काल अवर अकोला न्युज ने बातमी प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित होताच ग्राम पंचायत प्रशासन व काही सदस्यांनी दखल घेत काही तासात पाईपलाईन चे काम करून होणारा पाण्याचा दूषित पुरवठा बंद केला.
अधिक वाचा : गाडेगाव ग्राम पंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, पिण्याच्या पाण्यातुन शौचालयाचे पाणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola