तेल्हारा : स्थानिक हजरत शाह हाजी कासम अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था व सुलतान ग्रुप तेल्हारा च्या वतीने मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील 10, 12 वी मधील गुणवंत आणि समाजातील विधी, महसूल, वैदकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व गुणवंताचा भव्य सत्कार सोहळा दि 16 जुलै रोजी संपन्न झाला, कार्यक्रम अध्यक्ष म्हणून सै कमरोद्दीन एज्युकेशन सोसायटी पातूर चे सचिव सै कमरो द्दीन प्रमुख उपस्थिती म्हणून नायब तहसीलदार श्री विजय सुरळकर, संस्था अध्यक्ष गणी शाह मास्टर, उपाध्यक्ष शे अहेमद पुंडा साहेब, सचिव अफसर शाह, माजी नगर सेवक हाजी अन्वर शाह बाबू, अन्सार पटेल, वहिद सर, आदर्श शिक्षक एम ए इसहाक, सुलतान ग्रुप अध्यक्ष सलीम शाह पहेलवान, करीम पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवर मंडळी चे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले, यावेळी मुस्लिम समाजातील सै कमरोद्दीन, इसहाक सर, ऍड अख्तर शाह, पुरवठा अधिकारी कु रुहीना परवीन, डॉ मोहसीन कुरेशी यांचं समाजातील प्रथम गुणवंत आणि तेल्हारा तालुक्यातील उर्दू माध्यम शाळेमधील 10, 12 वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सम्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवर च्या हस्ते सत्कार करण्यात आले.
प्रास्तविक संस्था अध्यक्ष गणी शाह मास्टर यांनी मांडले, यावेळी नायब तहसीलदार श्री सुरळकर साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की गुणवंतानी इथेच न थांबता अधिक परिश्रम करून मोट्या पदावर नोकरी करावी, आपल्या पालकांचं नाव उज्वल कराव, त्याच प्रमाणे पुरवठा अधिकारी कु रुहीना परवीन ने विद्यार्थी नि गरीब परिस्थितीला न घाबरून जिद्दी, चिकाटीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून उच्च अधिकारी म्हणून आपले जीवन घडवून आणले जाऊ शकते आणि मी त्यांच उदाहरण असल्याचे सांगितले, कार्यक्रम अध्यक्ष सै कमरोद्दीन ने यावेळी संस्थे च्या वतीने गुणवंतंचा सम्मान केल्याबद्दल हजरत शाह कासम संस्था व सुलतान ग्रुप च्या संपुर्ण पदाधिकारी यांचं प्रति गौरव उदगार काढून गुणवंतानी भविष्यात ऊंच भरारी घेत देशाच्या विकासात योगदान करण्याचे आवाहन केले.
तेल्हारा तालुक्यात हजरत शाह हाजी कासम संस्था च्या वतीने मुस्लिम समाज करिता होत असलेल्या सामाजिक उपक्रमांनी प्रभावी होऊन संस्था अध्यक्ष गणी शाह मास्टर यांचं कार्यक्रम अध्यक्ष सै कमरोद्दीन यांनी विशेष सत्कार केलं,यावेळी कार्यक्रम ला संचालक सुलेमान शाह, अकबर शाह, इरफान शाह, अमीन शाह, शे अहेमद, ऍड अख्तर शाह, सहित खालिद सर, जब्बार सर, काजीम सर, मुजमिल सर, राजा कुरेशी, राजीक शाह, राहत शाह, युनूस शाह, शेख राजीक, सलीम येस बॉस, रफिक शाह, तंनू भाई, जाबिर जावई, रफिक शाह सहित गुणवंत विद्यार्थी चे पालक वर्ग उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन अझहर शाह सर तर आभार प्रदर्शन सचिव अफसर शाह यांनी केले.
अधिक वाचा : गाडेगाव ग्राम पंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, पिण्याच्या पाण्यातुन शौचालयाचे पाणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola