अकोट (प्रतिनिधी) : आज दि १६ ०७ २०१९ जुलै रोजी अकोट तालुक्यातील आदिवासी बहुल पोपटखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्धाटन प्रा अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी प्रा अंजलीताई आंबेडकर म्हणाले की आरोग्य केंद्राची अत्यंत आवश्यकता होती त्यामुळे जि प प्रशासनाचे माध्यमातून मंजूर करून दिले व पूनर्वसित आदिवासी गावातील महिलांसाठी या आरोग्य प्रसूतिची व्यवस्था व्हावी सर्व प्रकारच्या रुग्णांना सोईसुविधा पुरविण्यात यावी असे त्यांनी यंत्रणेला सांगितले पुढे म्हणाली कीआरोग्य ही धन संपदा व आरोग्य प्रत्येक माणसाचा मुलभुत हक्क आहे.
जि प उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती जमीरउल्ला पठाण यांनी सांगितले की सदर प्राथमिक आरोग्य केंद्र हे सन् दोनहजर तेरा मधे मंजुर असुन जिल्हा वार्षिक योजनेमधे दि. नऊ दो हजर पंधरा च्या जिल्हा परिषद् अकोला सर्व साधारण सभेमधे रूपये दोन कोटी चौपनलाख तिस हजार एवढ्या रक्मेची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली. तसेच सम्बंधित करारनामा सन् २०१७ १८ मध्ये व त्याचा कार्यारम्भ आदेश २४ एप्रिल २०१७ रोजी झाला होता.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम ३१ मार्च २०१९ ला पूर्ण करण्यात आले व मार्च २०१९ अखेर बांधकामावर दोन कोटी एकोनचालीस लाख त्रयन्नव हजार चारशे पंधरा रुपए खर्च करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्य्क्ष जि प अध्य्क्ष सौ संध्याताई हरिभाऊ वाघोड़े यांनी सांगितले की येत्या एक महिन्यापर्यन्त प्राथमिक आरोग्य केंद्रामधे आरोग्य सम्बंधित सर्व पद भर्ती व आवश्यक सर्व सोई सुविधा पुरविल्या जातील असल्याचे सांगितले .
या कार्यक्रमाला महिला आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट जि प सदस्य मंजूषा किशोर वडतकार सदस्य पं स सभापती आशाताई एखे उपसभापती सूर्यकांता घनबहादूर पं स सदस्य अंजलीताई पांडुरंग तायडे पं स सदस्य सुनीता कासदे माजी जि प सदस्य मंदाताई कोल्हे पोपटखेड सरपंच वृंदाताई जयसवाल खिरकुंड ग्रामप सरपंच डोलाराम तोटे जि प सदस्य रामदास मालवे तालुका आरोग्य अधिकारी डॉ तोरणेकर डॉ आशीष अकर्ते डॉ भिरडे शाखा अभियंता धनंजय बरडे भास्कर पोपटखेड ग्रामसेवक आर पी तायडे तालुका अध्य्क्ष संदीप आग्रे महिला आघाडी चे तालुका अध्य्क्ष सुनीता हीरोळे पांडुरंग तायडे रामकृष्ण टेकाम संजय कासदे गजानन बसले राजु एखे पत्रकार सय्यद अहेमद संतोष जैस्वाल गजानन पालवे अजय घंबहादुर समीर खान गौतम पचांग उपसरपंच विजेंद्र तायडे बळीराम वटघरे पत्रकार गौतम कदम शासकीय कंत्रातदार सुरेश नाठे आरोग्य सेविका आशा सेविका यांच्या मोठ्या संखेने गावकरी उपस्थित होते संचालन पत्रकार गौतम कदम व प्रस्ताविक मुख्यमंत्री ग्राम प्ररेक कु. पूजाताई पवार व सर्वांचे आभार डॉ भिरडे मॅडम यांनी मानले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola