अकोला : आगामी अमरावती विद्यापीठाच्या होणाऱ्या खुल्या निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येण्यासाठी अकोला शहरातील एका मुख्य ठिकाणी चर्चा केली आहे. तरी या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू यांनी कुठल्याही प्रकारे विद्यार्थी संघटनांना विश्वासात न घेता खुल्या निवडणुकीसंदर्भाचे परिपत्रक काढले आहे. तरी खुल्या निवडणुकांची नियमावली संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याशी चर्चा करण्याकरीता लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
महाविद्याविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रवेशाची क्षमता पुर्ण झाल्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये याकरीता अकोला जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी प्रवेशाची क्षमता वाढविण्यासाठी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंशी भेट घेणार आहेत. यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ, रिपब्लीकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हा संघटक आकाश हिवराळे, दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश इंगळे, सम्यकचे महानगराध्यक्ष आकाश गवई, महासचिव पवन गवई, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महानगराध्यक्ष शैलेश बोदडे, रिपब्लीकन विद्यार्थी सेनेचे स्वप्निल सोनोने, अक्षय दांडगे, विपुल सोनटक्के, सौरभ इंगोले, आनंद सोनोने, मनिष अरखराव, सुमित शिरसाट, अविनाश सावळे, अजय अंभोरे यांच्यासह विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola