बाळापूर (श्याम बहुरूपे) : दि.१० बाळापूर आणि पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळचे पैसे खर्च केल्यानंतर ही खोदलेल्या विहिरी चा मोबदला मिळाला नसून या बाबद बाळापूर पंचायत समितीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी आयोजित केलेल्या बैठकीत अधिकारी आणि ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरलं आहे.
तसेच या बैठकीला ग्रामसेवक गैहजर असल्याने नितीन देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे २०१५ आणि १६ या वर्षांपूर्वी चे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दोन तीन दिवस पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य नितीन देशमुख यांना सोबत घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली होती.
यावेळी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा आदेश दिला होता सिंचनाच्या माध्यमातून शेतमालाच उत्पादन वाढावं यासाठी शासन विहीर खोदण्यास अनुदान देते शेतकरी वेळ प्रसंगी कर्ज काढून विहीर खोदतात मात्र अनुदान वेळेवर अनुदान मिळत नाही शासकीय यंत्रणांच्या कार्याचे उंबरवठे झिजवल्या नंतर ही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते या संदर्भात नितीन देशमुख यांनी जिल्हापरिषद सिओंची भेट घेऊन प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या विहिरीच्या सर्व प्रश्नांनसाठी बाळापूर येथे पंचायत समितीच्या सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य नितीन देशमुख हे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले परंतु बैठकी मध्ये काही ग्रामसेवक गैहजर असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात मोबदला न मिळाल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
या बैठकीला बाळापूर चे गटविकास अधिकारी घाटे,तसेच विविध विभागाचे अधिकारी यांचे सह शिवसेना माजी तालुकाप्रमुख उमेशअप्पा भूसारी,नगर परिषद माजी उपाध्यक्ष करणसिंह ठाकूर, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, शिवसेना बाळापूर शहरप्रमुख आनंद बनचरे, युवासेना शहरप्रमुख श्याम बहुरूपे, दिल्लू ठाकूर, शुभम जोध, संतोष आगरकर, बाला ठाकूर, देवर्षी देशमुख, व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola