अकोट (प्रतिनिधी) : प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे उर्दू हायस्कुल ते खाई नदी पर्यंत रस्त्याचे काम मागील 2 वर्षा पासुन सुरू आहे विकासाच्या नावावर रस्त्या वरी अतिक्रम काढण्यात आले. अत्यंत निकृष्ट असे काम करण्यात आले सर्व रस्ता चिखलमय झाला आहे. अंजनगाव रस्त्या जवळील लोक नरकयातना भोगत आहे. अनेक सामाजिक राजकीय पक्षांनी निवेदने देवून सुद्धा प्रशासनाने काही केले नाही त्यामुळे प्रहार ने अंजनगाव रोडवरील उर्दूहास्कुल येथे धरणे आंदोलन केले आकोट नगर परिषदेने उर्दूहास्कुल इकरा हास्कुल पर्यंत रस्त्याची परिस्तिथी अत्यंत दयनीय आहे लोकांना रस्त्यावरुन चालणे सुद्धा कठीण आहे. याचा निषेधार्थ प्रहार तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलना मध्ये स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते.
शाळेकरी मुलांनी आंदोलनात सहभाग घेऊन हम स्कुल कैसे जाय आशा प्रकारचे फलक लावुन निषेध केला. आंदोलन स्थळी नगरपरिषद अभियंता श्री शर्मा जीवन प्राधिकरण अभियंता इंगळे तसेच सार्वजनिक बंधकाम अभियंता आवारे साहेब यांनी संबंधित कामा बाबद आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले जिल्हा प्रमुक तुषार पुंडकर यांचा नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले तालुका कार्याध्यक्ष कुलदीप वसु तालुका युवक अध्यक्ष अविनाश घायसुदर, विशाल भगत, समीर जामदार, संदीप मर्दाने, बली भाई नाजीम शेख, निखील तापडिया, शाफिक जमादार, वसीम भाई, तौफिक शेख, राजू ढोले, बंडू शिरसाट, शेख मुक्तर, अब्दुल जमील, सलीम शेख, सैयद अबरार, अर्षद खान, साजिद भाई शेख जुबेर अयाज जमादार शेख सलमान उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोट न. प. गटनेते मनीष कराळे यांच्या ईशारा अन प्रशासन लागले कामाला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola