अकोट (देवानंद खिरकर) : स्थानिक अंबिका नगर परिसरा मध्ये कॅनरा बँक समोर नागरिकांच्या रहदारीचा मार्ग आहे पावसाळा सुरू झाला असुन नियोजन मात्र शुन्य जणु काही या रस्त्याला न.पा. प्रशासनाच्या डोळेझाक पणामुळे तलावाचे स्वरूप आले होते. स्थानिक नागरिकांना मार्गक्रमण करण्यास त्रास सोसावा लागत होता.
कर्तव्यदक्ष नगरसेवक मनिष रामाभाऊ कराळे यांनी ही बाब न.पा. प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणुन दिली. पण उपाययोजना काहीच नाही. आज सर्व प्रकार लक्षात घेत शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे यांनी न.पा. प्रशासनाला सुचना वजा इशारा देताच त्वरित मुरूम टाकण्यात आला. याबद्दल सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
अधिक वाचा : त्या दारुड्या डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रार, जिल्हा परिषद आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola