हिवरखेड (दिपक रेळे) : दानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दारूडे डॉक्टर अनिरुद्ध वेते हे नियमित नशेत राहत असल्यामुळे दानापूर सोबतच संलग्नित अनेक गावांचे रुग्ण आणि नातेवाईक तसेच सहकारी नागरिक पुरते वैतागले आहेत. अनेक आदिवासी गावे सुद्धा या प्राथमिक आरोग्य केंद्रावर निर्भर आहेत.
विशेष म्हणजे अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दत्तक घेतलेल्या गावातच दारुड्या डॉक्टर अनेक दिवसांपासून कार्यरत असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. दि 8 जून रोजी शेतात काम करणाऱ्या एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे तिला दानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे दारुड्या डॉक्टर अनिरुद्ध वेते ड्युटीच्या वेळी दारू पिऊन चिंग झालेले होते. त्यांनी तिथे बराच धिंगाणा घातला. त्यांच्या या प्रकारामुळे सर्पदंश झालेल्या महिलेचे उपचार दानापूर ते होऊ शकले नाहीत त्यामुळे त्या महिलेला तेल्हारा येथे नेण्यात आले. सदर ठिकाणी या दारुड्या डॉक्टरांचे प्रताप रुग्ण व नागरिक अनेक दिवसांपासून उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. या दारुड्याला कंटाळून अनेक कर्मचाऱ्यांनी येथून आपली बदली करून घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील बऱ्याच जागा रिक्त आहेत.
एवढेच नव्हे तर या डॉक्टर वेते बाबत अनेक तक्रारी असून ह्या दारुड्या डॉक्टरच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु तरीही ते सध्या दानापूर येथेच कार्यरत आहेत. दारुड्या डॉक्टर मुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे व त्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दैनंदिन ओपीडी सुद्धा प्रभावित झाली आहे.
सदर दारुड्या डॉक्टर चे प्रताप सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल झाल्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेल्यामुळे शेवटी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष तोरसकर यांनी दिनांक आठ जून रोजी या दारुड्या डॉक्टर विरोधात हिवरखेड पोलीसात लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. सदर निवेदनावर सध्या तरी कोणतीही कारवाई झालेली नाही.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची कमी असून शासनाने लवकरात लवकर एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी एकमुखी मागणी जनतेमधून होत आहे.
प्रतिक्रिया
या दारुड्या डॉक्टरचे व्हिडिओ काढून वरिष्ठांना सुद्धा कळविले. आमदारांनी दत्तक घेतलेला गावातच आरोग्याबाबत ही परिस्थिती आहे तर इतर ठिकाणचा विचार न केलेलाच बरा. राजकुमार भट्टड सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वेते यांच्या अनेक तक्रारी असल्यामुळे त्यांना डेपोटेशन दिली आहे. परंतु त्यांनी दानापूर चा पदभार सोडलाच नाही. नेहमी ड्युटीच्या वेळी दारू पिऊन नशेत राहत असल्याबद्दल पोलिसात तक्रार केली आहे.
डॉ. सुभाष तोरणेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी तेल्हारा.
अधिक वाचा : दारु पिऊन गाडी चालवल्यावर इंजिनचं सुरु होणार नाही; गडकरींचं भन्नाट तंत्रज्ञान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola