अकोला : श्रीनगर- अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या ३०० भाविकांना सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमध्येच रोखण्यात आले आहे. त्यात अकोल्यातील २५ जणांचा समावेश असून हे सर्व भाविक सुरक्षित असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
१ जुलैपासून ४५ दिवसांची अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. त्यासाठी देशभरातील भाविक श्रीनगरमध्ये दाखल होतात. आतपर्यंत ८१ हजार भाविकांनी बाबा बर्फानीचं दर्शन घेतलं आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अमरनाथ यात्रेवर अतिरेक्यांचा हल्ला होण्याची शक्यता असल्याने श्रीगनरमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला आहे. श्रीनगर एअरपोर्टलाही सुरक्षेचा वेढा पडला आहे.
मात्र कालपासून श्रीनगरमध्ये तणाव निर्माण झाल्याने ३०० भाविकांना श्रीनगरमध्येच रोखण्यात आलं आहे. या भाविकांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या भाविकांमध्ये अकोल्याचे २५ जण असून हे सर्व भाविक सुरक्षित असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अधिक वाचा : अकोला – महापालिकेचा बाजारपेठेतील अतिक्रमणावर हातोडा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola