अकोला : अकोला महापालिकेच्यावतीने शहरातील गांधी रोड ते जैन मंदिर, खुले नाट्यगृह आणि सरकारी गोदाम परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. रस्त्यावर विक्री करणाऱ्या किरकोळ व्यवसायिकांनी मोहिमेला विरोध केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी केल्याने लगेच वातावरण शांत झाले.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सिटी कोतवाली ते गांधीरोड ते जैन मंदीर रोड, खुले नाट्य गृह ते फतेह चौक, काला चबुतरा परिसर, इंदौर साडी गल्ली येथील अतिक्रमण काढण्यात आले. वाहतुकीस अडथळे निर्माण करणारे चार चाकी गाड्यांचे अतिक्रमण काढण्याात आले. कारवाईला व्यवसायिकांनी विरोध करताच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण लगेच शांत झाले.
सरकारी गोदामाच्या बाजुला बिट्टीसेठ ले-आउट मधील संरक्षक भिंती, ओटे आणि पाय-यांचे अतिक्रमण काढण्यात आली आहेत. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे नरेंद्र घनबहादुर, प्रवीण मिश्रा आणि अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी केली.
अधिक वाचा : अकोला : कस्टम ड्युटी वाढीमुळे ग्राहकांच्या संख्येत होणार घट, सराफा व्यावसायिकांना भीती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola