अकोला : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कुणबी युवा मंच संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माणीक शेळके यांची राष्ट्रीय काँग्रेस सेवादल (ग्रामीण) च्या युवक जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या हस्ते नियुक्ति करण्यात आली.
माणिक शेळके हे विवीध संघटनांच्या माध्यमातून शेतकरी व युवकांचे प्रश्न शासनासमोर मांडण्याचे व सोडविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत पाटीदार समाजाचे नेते, युवा आंदोलनकारी हार्दिक पटेल यांचे महाराष्ट्रातील खंदे समर्थक असून त्यांच्या किसान क्रांती सेनेचे विदर्भ अध्यक्ष सुद्धा आहेत. गेल्यावर्षी 23 मार्च या क्रांतिदिनी अकोला येथे झालेल्या हार्दिक पटेल यांच्या एल्गार मेळाव्याच्या आयोजनात देखील त्यांचा मोठा सहभाग होता. लोकसभा निवडणुकी पूर्वी हार्दिक पटेल यांच्या 12 एप्रिल रोजी झालेल्या काँग्रेस प्रवेशा नंतर माणिक शेळके यांनी देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुर्तीजापुर येथिल जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. व पक्षामध्ये कार्यरत राहण्यासाठी काँग्रेसची वैचारिक फळी मानल्या जाणाऱ्या काँग्रेस सेवादल च्या युवक जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली माणिक शेळके यांच्या रूपाने कुणबी समाजाचा एका नव्या चेहऱ्याला काँग्रेस पक्षाने संधी दिल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मदन भरगड, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विजय शर्मा, जिल्हा काँग्रेसचे प्रकाश तायडे, शहर काँग्रेसचे राजेश भारती, महेश गणगणे, तशवर पटेल, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता साजीदखान पठान, नगरसेवक पराग कांबळे, प्रशांत भटकर, महेन्द्र गवई आदी जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : India budget 2019 : जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola