अकोला : तेल्हारा तालुक्यातील महत्वाचे कार्यलय असलेल्या तेल्हारा ते गाडेगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने सदर रस्ता विनाविलंब दुरुस्त न केल्यास शिवसेना व गाडेगाव मधील नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन 3 जुलै ला शिवसेनेच्या वतीने तहसीलदार तेल्हारा यांना देण्यात आले.
तेल्हारा गाडेगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यांमध्ये रस्ता हे समजण्या पलीकडे झाले आहे तरी सुद्धा संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधी डोळेझाक करतांना दिसतात सदर रस्त्याच्या दुरुस्ती विषयी अनेक वेळा निवेदन सादर करण्यात आले आहेत परंतु परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना काही घेणे देने नाही असे दिसून येते तेल्हारा ते गाडेगाव रस्त्यावर तहसील कार्यालय, कोर्ट तसेच अनेक शासकीय कार्यलय आहेत या रस्त्यावर अधिकारी, नागरिक व विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात वर्दळ असते त्यांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते .
शाळेतील मुलांना या रस्त्यावरून जातांना मोठी कसरत करावी लागते रस्त्यावरील खड्यात पाणी साचल्याने चिखल व पाण्यामुळे विध्यार्थ्यांचे गणवेश खराब होतात वेळप्रसंगी त्यांना शाळेत न जाता घरी वापस यावे लागते त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असून अनेक जण जखमी झाले आहेत तेल्हारा ते गाडेगाव हा रस्ता सात दिवसाच्या आत दुरुस्त करण्यात यावा अन्यथा शिवसेना शाखा गाडेगाव च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार तेल्हारा यांना देण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आला आहे.
या वेळी गाडेगाव शिवसेना शाखा प्रमुख नितीन आखरे, माजी तालुका प्रमुख बंडुभाऊ रुद्रकार, संदीप अवारे, गणेश काळे, गजानन वडतकार, पंकज बोर्डे, दिनकरराव नळकांडे, चेतन नळकांडे, संजय साबळे, नितीन साबळे, पप्पू काळमेघ सह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा : पातूर तालुका युवक काँग्रेस तर्फे गुणवंत विद्यार्थी चा सत्कार सोहळा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola