हिवरखेड (दिपक रेळे) : लोकजागर मंच ही सामाजिक संघटना नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. यावर्षी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष मा. अनिल गावंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन लोकजागर मंच शाखा हिवरखेडने आई-वडील नसलेल्या व अतिशय हलाखीच्या परिस्थितीत मामाकडे शिक्षण घेत असलेल्या बि.एस.सी द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या पण परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याच्या विचारात असलेल्या कु. फरजाना बी मो. असिफ या हुशार विद्यार्थिनीचे शैक्षणिक दायित्व स्वीकारून तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी लोकजागर मंचचे संस्थापक श्री अनिलभाऊ गावंडे यांनी स्वीकारली आहे.
तसेच या प्रसंगी स्व. भाऊदेवराव गिर्हे नगर वॉर्ड न. 2 मधील 31 वृद्ध, निराधार व गरजू व्यक्तींना कपडे वाटप करण्यात आले. यामुळे त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य उमलले. त्याआधी स्व.डॉ.का.शा. तिडके चौक सोनवाडी फाटा ते लेंडी नाला, स्व.भाऊदेवराव गिर्हे नगर व मदरसा मध्ये 101 वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी सरपंच सौ.अरुणाताई ओंकारे, पो.पा. प्रकाश गावंडे, लोकजागर मंचचे शहराध्यक्ष महेंद्र कराळे, सुरेश ओंकारे, राजेश वानखडे, धिरज बजाज, रितेश टीलावत, अर्जुन खिरोडकार, किरण सेदानी, मनीष भुडके, पुरुषोत्तम गावंडे, बलराज गावंडे, अंकेश भांबुरकर, विलास घुंगड, उमेश टापरे, उमेश तिडके, मनीष गोरद, राजेश टाले, सचिन बाळापुरे, सलमान खान, शहजादा खान, दानिश खान, कल्लू भाई, धनंजय गावंडे, मो. यासिन, सागर खारोडे, गौरव गावंडे, संतोष गावंडे, गौतम इंगळे, निखिल भड, पंकज देशमुख, रमेश व्यवहारे, संजय मानके, माधव गावंडे, निलेश मगर, मोतिभाई, अनिल मस्के, युवराज ठाकरे, गोपाल चाफे, कार्तिक गणेश, रुपेश भरक्षे इ.उपस्थित होते.
अधिक वाचा : अतुल कुडवे दिग्दर्शित इंस्पायर स्टोरी मधे अकोल्यातील अभिनेता प्रफुल वाडेकर ची वर्णी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola