बाळापूर (शाम बहुरूपे) : दिनांक 28।6।19 रोजी वाडेगाव येथील वासुदेव नारायण पाल्हाडे हे नेहमी प्रमाणे 9 बकऱ्या घेऊन सकाळी 10 वाजता चारण्या साठी घेऊन गेले, संध्याकाळी 4 वाजता वाडेगाव कडे बकऱ्या सह परत येत असतांना चांनी फाट्या जवळ रोडवर अचानक एक इंडिगो कार येऊन थांबली व त्या मधून दोन व्यक्ती उतरून त्यांनी एक बकरी पकडून गाडीत कोंबली व बाळापूर कडे कार भरधाव वेगाने घेऊन गेले, त्यांनी ह्या बाबत फिर्याद बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदविली असता पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी तपास चक्रे फिरवून संशया वरून अश्या प्रकारचे काम करणाऱ्या शेख रहीम शेख कलीम ह्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी भाषेत विचारले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याचे कडून 3 बकऱ्या व 1 इंडिगो कार एकूण किंमत 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, त्याचे इतर साथीदारां चा शोध घेण्यात येत असून आरोपी ची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक पडघन, पोलिस हेडकॉन्स्टेबल पवार, गावंडे हे करीत आहेत.
अधिक वाचा : वाडेगाव येथे गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola