अकोला : पुण्यात कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १७ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्येही मुलांचा समावेश आहे. मृत झालेले सर्व मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते, अशी माहिती समोर आलीय.
बडा तालाब मस्जिद पसरिसरात अल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. या भिंतीला लागून मजुरांच्या कच्च्या झोपड्या होत्या. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला इमारतीचं काम सुरू होतं. इमारतीचा पाया बांधण्यासाठी ४० ते ५० फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपड्या अल्कन स्टायलस या सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात आल्या होत्या. पण पावसामुळे सोसायटीची पार्किंगची संरक्षण भिंत खचून ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. बांधकाम प्रकल्प कोणाचा आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
कोंढव्यातील घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती पुण्याच्या माहपौर मुक्त टिळक यांनी दिली.
मृतांची नावे
१) आलोक शर्मा – २८ वर्षे
२) मोहन शर्मा – २० वर्षे
३) अजय शर्मा – १९ वर्षे
४) अभंग शर्मा – १९ वर्षे
५) रवि शर्मा – १९ वर्षे
६) लक्ष्मीकांत सहानी – ३३ वर्षे
७) अवधेत सिंह -३२ वर्षे
८) सुनील सींग -३५वर्षे
९) ओवी दास – ६ वर्षे (लहान मुलगा )
१०) सोनाली दास – २ वर्षे (लहान मुलगी )
११) विमा दास -२८ वर्षे
१२) संगीता देवी -२६ वर्षे
जखमीः १) पूजा देवी – २८ वर्षे
अधिक वाचा : गृहमंत्री अमित शहा : जम्मू-काश्मीरचे कलम ३७० तात्पुरते
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola