बाळापूर (प्रतिनिधी)– शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडल्याने दोन शेतकरी ठार झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवार, २८ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. कपिल दिपक शेगोकार (१६)व बाळू नारायण उमाळे (५५)अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवारी एका शेतात पेरणी सुरु असताना दुपारच्या वेळी विजांच्या कडकडाटासह अचानक ढग दाटून आले. यावेळी शेतात पेरणी करीत असलेल्या कपील शेगोकार व बाळू उमाळे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते दोघेही गंभीररित्या भाजल्या गेले. दोघांनाही तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
अधिक वाचा : सर्व पिके पीक विम्यात समाविष्ट करून १२ टक्के व्याज द्या,प्रहारची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola