आकोट : आकोट तेल्हारा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर झाल्यावर सुद्धा कुठलीच शासकीय मदत आता पर्यंत मिळाली नाही तसेच २०१८-२०१९ मधील पिकांना विमा जाहीर करण्यात आला तालुक्या मध्ये सोयाबीन व कपाशी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे तसेच शेतकऱ्यांनी बँका मध्ये मोठया प्रमाणात पीकविमा काढला परंतु कंपनीचे नुकसान होऊ नये म्हनुन सोयाबीन तसेच कापशी पिके मंजुर पिकविम्या मधुन वगळण्यात आली.
दुष्काळ जाहीर झाल्या नंतर सर्व पिकांना विमा मिळने आवश्यक होते परंतु सोयाबीन कपाशी पिकांना विमा न देता विम्याचे पैसे हळप करण्याचा प्रयत्न कम्पनी तसेच भाजपशिवसेना युती सरकार करीत आहे.पिक नुकसान झाल्या पासुन २ महिन्याचा आत पीकविमा रक्कम शेतकऱ्यांचा खात्या मध्ये जमा करणे बंधनकारक आहे न केल्यास १२% व्याज लावण्यात येईल असा आदेश या सरकारने काढला होता. त्याचा नुसार १२% व्याज पीकविमा रक्कमेवर देण्यात यावे तसेच दुष्काळ घोषित केल्यावर सुद्धा कुठल्याच प्रकारची मदत शासन तर्फे देण्यात आली नाही दुष्काळ घोषित झालेल्या जिल्ह्या मध्ये जनावरांसाठी चाराछावण्या मोठ्या प्रमाणात उघळण्यात आल्या परंतु प्रशासन तसेच सत्ताधारी यांचा उदासीनते मुळे अकोला जिल्हामध्ये आवश्यकता असल्यावर सुद्धा चाराछावण्या उघडण्यात आल्या नाही.
ग्रामीण भाग मध्ये पाण्याची भिषण टंचाई असल्यावर सुद्धा कठल्याच उपाय योजना करण्यात आल्या नाही. नावा पुरती दुष्काळ घोषित करून सर्वसामान्य जनतेच्या हाता मध्ये गांजर देण्याचे काम भाजपशिवसेना युती सरकार करीत आहे तरी सोयाबीन कपाशी पिकांना लवकरात लवकर पिकविमा जाहीर करा तसेंच१२% व्याज पीकविमा रक्कमेवर देण्यात यावे दुष्काळी निधी देण्यात यावा याची दखल तात्काळ घ्यावी नाहीतर प्रहार तर्फे उग्र आंदोलन करणयात येईल याची नोंद घ्यावी.
अधिक वाचा : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वाडेगांव येथे शाळा प्रवेश उत्सव दिंडी उत्साहत साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola