बोर्डी(देवानंद खिरकर)– उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना थोडा हुरहूर करणारा असतो मात्र बोर्डी येथील जिल्हा परिषद शाळा प्रशासनाने अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनातील हुरहुरी काढून बैलगाडीमधून त्यांना शाळेत घेऊन जाण्यात आले. यावेळी गावातून प्रभात फेरी काढून शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करून शाळेचे वर्ग सुरू करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय साळुंके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल गेबड व त्यांचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विध्यार्थी सर्व हजर होते. बोर्डी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळून देण्याकरिता मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी खुप मेहनत घेऊन बोर्डी शाळेचे नाव पुर्ण जिल्ह्यात लौकिक केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शाळेकरिता अकोट तालुक्यातून बोर्डी शाळेची निवड करण्यात आली आहे हे विशेष.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola