अकोट(देवानंद खिरकर)– शिवसेना पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आदेशान्वये व मा.केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत साहेब संपर्क प्रमुख यांचे प्रेरणेने अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात व प्रत्येक प्रभागनिहाय शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यासाठी तसेच अकोट तहसील कार्यालयावर शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेले पीक विमा मदत केंद्र आढावा आज दि.२५ जुन रोजी मा.जिल्हाप्रमुख नितीनबाप्पु देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शनात अकोट विधानसभा मतदार संघातील सर्व उपतालुका प्रमुख,जि.प.सर्कल प्रमुख यांची बैठक सर्कीट हाऊस अकोट येथे संपन्न झाली. यावेळी जिल्ह्याप्रमुख यांनी पीक विमा मदत केंद्राबाबत माहिती घेत आतापर्यंत भरलेल्या अर्जाची माहिती घेत संपूर्ण आढावा घेतला तसेच येत्या आठवड्याभरात संपुर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात शिवसेनेची शाखा निर्माण करू व शाखाप्रमुख नियुक्त करू असे जिल्हाप्रमुखांनी सांगीतले.
या सभेस उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर,तालुका प्रमुख श्याम गावंडे, शहर प्रमुख सुनील रंधे,रोशन पर्वतकार,ज्ञानेश्वर ढोले,विक्रम जायले,गोपाल भाऊ म्हैसने,शिवसेना महिला आघाडीच्या उषाताई गिरणाळे,नर्मदा कहार,शिल्पा ढोले,संगीता सावरकर,प्रतिभा जांभळे,शिवसेनेचे प्रशांत येऊल,श्रीकांत कांबे,गणेश चंडालिया,दीपक रेखाते,बंटी बुंदेले,जयपाल ठाकूर,उमेश आवारे,राहुल पाचडे, देवानंद बोरोडे,नंदू कुलट,गोपाल विखे,विठ्ठलराव जोगी,प्रदीप विखे,अविनाश गावंडे,डॉ.अढाऊ,गणेश वाशिमकर,संतोष जगताप,आशिष उखळकर,योगेश सुरत्ने,सोपान साबळे,सोपान पोहरे,प्रफुल वाघ,धीरज गावंडे,अमोल बदरखे,रंजित कहार,सुरेश शेंडोकार,अविनाश नाथे,उमेश मेहनकार,नितीन कोल्हे,शरद खेडकर यांच्या सह सर्व पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा : पीक विम्यापासून वंचीत शेकऱ्यांचा बाळापूर शिवसेनेच्या मदत केंद्रास प्रचंड प्रतिसाद