मुंबई : मुंबईच्या बेस्ट प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबईतील बेस्ट प्रवासाचे किमान भाडे 5 रुपये होणार आहे. तसेच एसी बसचे किमान भाडे 6 रुपये होणार आहे. बेस्टच्या नवीन भाडेरचना प्रस्ताव समितीच्या वतीने मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव पुन्हा पालिका स्थायी समितीकडे जाईल. त्यानंतर राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर बेस्टच्या साध्या बसचे किमान भाडे 5 रुपये तर एसी बसचे किमान भाडे 6 रुपये होणार आहे.
पाच किलोमीटर अंतरासाठी 5 रुपये साध्या बसचे भाडे असेल. तर एसी बसचे भाडे 6 रुपये असेल. 10 किमोमीटरपर्यंत भाडे साध्या बससाठी 10 रुपये तर एसी बससाठी 13 रुपये असेल. 15 किलोमीटरपर्यंत साध्या बसचे भाडे 15 रुपये तर एसी बसचे भाडे 19 रुपये असेल. 15 किलोमीटरवरील अंतरासाठी साध्या बसचे भाडे 20 रुपये तर एसी बसचे भाडे 25 रुपये असेल. साध्या बससाठी सर्वसाधारण, मर्यादीत आणि जलद सेवेसाठी कमाल भाडे 20 रुपये तर एसी बससाठी कमाल भाडे 25 रुपये असेल.
अधिक वाचा : IPS अजय पाल शर्माने बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1