अकोट(देवानंद खिरकर) : वृक्षतोड करुन लाकडाची अवैध वाहतुक करनार्या ट्रक क्रमांक यम यच 04 यफ 6097 या ट्रकवर सोमवारी विशेष पथकाने छापा टाकून पकडून कारवाई केली. या ट्रकमधे ओल्या निम्बाच्या झाडाची कत्तल करुन, लाकडाची अवैध वाहतुक करण्यात येत आहे. हे वाहन अकोला रोड वरुन अकोट शहर कडे येत असल्याची माहिती मिळाल्या वरुन सेन्ट्रल बँक जवळ सापळा रचून वाहन थांबवले. तरी त्यांची तपासणी केली असता त्यांचे कडे वाहनात निंबाची ओली लाकडे आढळून आली.
14 हजार 260 रुपयेचे पाच घन मिटर लाकडाचा माल जप्त केला आहे. वाहन चालक शेख साजिद शेख जाहिर वय 38 याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने लाकूड विकत घेनार्याचे नाव सयद ईब्राहिम वय 56 संगीतले. तरी त्यांचे कडे कुठलाही परवाना नसल्याचे समोर आले. पोलिसांनी 4 लाख रुपये किमतीचे वाहन व 14 हजार 260 रुपये किमतीचे ओले निंम्बाचे लाकडे जप्त केले. तसेच या आधी सुधा याच पथकाने लाकडाचा ट्रक पकडून कारवाई करण्यात आली होती.त्यामूळे अकोट येथिल वनविभाग व लाकडे तोडनारी मालक, दलाल यांचे साटे लोटे असल्याचे या कारवाई वरुन पुर्णपणे उघड होत आहे. तरी बोर्डी, शिवपुर, रामापुर, शेत शिवारतून सुधा बर्याच लाकडाची कटाया झाल्याची जोरदार चर्चा आहे. या बाबत अकोटचे वनविभाग बिट अधिकारी सुरजुसे यांच्याशी दूरध्वनि वरुन सम्पर्क साधला असता ते प्रतिसादच देत नाहित व त्यांनी नम्बर ब्लैक लिस्ट मधे टाकला आहे. अकोट येथिल वन विभागाचे असलेले ऑफ़िस हे फक्त सकाळी 12 परंतच उघडे असते मग ऑफ़िस बंदच राहते तिथे कोणतेही अधिकारी नसतात. सायंकाळी दररोज 6 ते 9 च्या दरम्यान 407 ट्रक ताडपत्रि ने वरतुन झाकुन वन विभागाच्या अकोट येथिल ऑफ़िस समोरुन खुले आंम आरामशीन वर अकोटला जातात ही उल्लेखनीय बाब आहे. एकिकडे झाडे लावा झाडे जगवा ही शासनाची मोहीम कोटी रुपये खर्च करित आहे आनी एकिकडे कितेक वर्ष्याची जिवंत असलेली निबाची झाडे कुठलिही परमीशन नसतांना कापन्यात येत आहेत ते म्हणजे फक्त हप्तेखोरी मुळे कापन्यात येत आहेत. तरी वरिष्ट अधिकारी यांनी सुरु असलेल्या पुर्ण अकोट तालुक्यातील कटाया होण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी आनी कर्मच्यारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. आनी सुरु असलेल्या वारेमाप लाकडाच्या कटाया थाम्बवाव्या अशी मागणी सर्व निसर्गप्रेमी मधून होत आहे.
अधिक वाचा : दुषीत पाणी पुरवठा प्रहार आक्रमक, जिवन प्राधीकरणाला प्रहारने दिले निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola