अकोला (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघाच्या संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ता प्राचार्य डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांची नियुक्ती करण्यात आली. मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत ही निवड करण्यात आली.
मराठा सेवा संघांतर्गत कक्ष बांधणीसाठी केंद्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय सभा सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी येथे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महासचिव मधुकर मेहकरे, सोमनाथ लडके, अरविंद लडके, डॉ.निर्मला पाटील सांगली, अशोक महल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील मराठा सेवा संघाचे सर्व जिल्हाध्यक्षांसह अकोला जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार, प्रा.प्रदीप चोरे, संघर्ष सावरकर, नितीन धोरण आदी उपस्थित होते.
कार्यकारिणीच्या सभेमध्ये विविध विषयांवर मंथन करण्यात आले. सभेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. कक्षामार्फत राज्यभर संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रचार-प्रचार करण्यासह स्वच्छता व सामाजिक क्षेत्रात विविध कार्य करण्यात येते. डॉ.पुंडकर यांच्या निवडीचे सर्वस्तरावरून स्वागत करण्यात आले. बाळापूर येथील डॉ.मनोरमा व हरिभाऊ पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याालयात प्रचार्य पदावर डॉ.धैर्यवर्धन पुंडकर कार्यरत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्याापीठाच्या विद्वत सभेवर सदस्य म्हणून ते कार्यरत होते. तसेच विद्याापीठाच्या विविध प्राधिकरणांवर कार्य करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यरत पुढाकार घेऊन त्यांनी विविध कार्य केले. वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने बाळापूर येथे वीटभट्टी शाळेचा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला. डॉ.पुंडकर प्रदेश प्रवक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका राज्यस्तरावर प्रभावीपणे मांडत आहेत.
अधिक वाचा : दुषीत पाणी पुरवठा प्रहार आक्रमक, जिवन प्राधीकरणाला प्रहारने दिले निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola