अकोला (प्रतिनिधी)– जिल्ह्यातील पोलीस दलातील 254 कर्मचाऱ्यांच्या बदल्या आज पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केल्यात. या बदलीसोबतच पोलिस अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या बदलीनंतर आता त्यांच्या जागेवर कोण बसणार याबाबत पोलिस विभागात चांगलीच चर्चा आहे.
जिल्ह्यातील पोलिस विभागातील विनंतीवरून 102 आणि प्रशासकीय वरून 152 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेत. या बदलीनंतर या कर्मचाऱ्यांना तत्काळ रिलिव्ह करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेंच पोलिस अधिकारी यांच्याही बदल्यांचे आदेश अमरावती पोलिस महानिरीक्षक यांनीही काढलेत. अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलाश नागरे यांची बदली बुलढाणा झाली आहे. या बदलीने त्यांच्या जागेवर कोण अधिकारी बसणार याकडे आता पोलिस विभागात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या जागेसाठी अकोला शहरातील 2 आणि ग्रामीण भागातील 2 पोलिस निरीक्षक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामध्ये शहरातील शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक तथा खदान पोलिस निरीक्षक विलास पाटील, रामदास पेठचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे तर ग्रामीणमधून अकोट शहराचे संतोष महल्ले आणि बाळापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या चौघानपैकी कोण स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार होतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : सिटी कोतवाली पोलिसांची वरली अड्ड्यावर धाड, मुद्देमालासह आरोपींना अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola