तेल्हारा(प्रतिनिधी)– शहरात आज पहाटे ७ वाजेच्या दरम्यान चारचाकी रिव्हर्स घेत असताना दोन वर्षीय चिमुकलीचा अपघात होऊन मृत्यु झाल्याची घटना घडली. शहरातील ओम नगरमधील देशमुख यांच्या शुद्ध पाण्याच्या प्लांट वर थार येथील चारचाकी मॅक्सिमो क्रमांक एम एच ३० ए बी १०७७ घेऊन चालक पाण्याच्या कॅन घेण्यासाठी आला.असता सदर ठिकाणी चारचाकी रिव्हर्स घेत असताना चारचाकी च्या चपाट्यात येऊन दोन वर्षीय अधिरा संदीप टिकार हिला गंभीर दुखापत झाल्याने तिला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस तपास करीत आहेत.
संदीप टिकार यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना दोन वर्षीय अधीरा ही एकुलती एक मुलगी होती तिच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : दुष्काळग्रस्त निधी व पिकवीमा मिळने करिता अकोट तहसीलदार यांना दिले निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola