अकोला (प्रतिनिधी) : अकोला एम.आय.डी.सी. येथील श्री. अरिहंत इंटप्राइजेसच्या कामगारानी लाल बावटा अभियांत्रिकी संघटनेत प्रवेश घेवुन आज कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक कामगार आयुक्त अकोला, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अकोला, आयुक्त भविष्य निर्वाह निधि अकोला यांना निवेदन देवून श्री. अरिहंत कारखाण्यातील कामगार गेल्या ५ ते १० वर्षा पासुन गैरअर्जदाराकडे नोकरी करीत आहे. कामगारांन कडुन ८ तासाच्यावर रोजाना काम करवून घेत आहे. कामगारांना कधीही हजेरी तथा वेतन कार्ड देण्यात आलेले नाही. अर्जदारांनी या बाबत कधीही तक्रार केलेली नाही.
व्यवस्थाप यांनी अर्जदाराचे वेतन बँके मध्ये दर महा २ चेक व्दारे जमा करीत होते. अर्जदारांनी या बाबत कधिही तक्रार केलेली नाही. १ कारखाना व १ मॉल आहे अंदाजे ५० कामगारांच्यावर कामगार सदर आस्थापनेत काम करीत आहे.
व्यवस्थाप गेल्या एप्रिल महिण्या पासुन सर्व कामगारांना त्रास देत आहे. ५ मिनट १० मिनट उशीर झाल्यास कामगारांना कामावरुन वापस पाठवीत आहे. बोलण्यामध्ये धमकीची भाषा वापरण्यात येत आहे. मे २०१९ महिण्यात तर गैरअर्जदारांनी वेतनाचे एकच चेक जमा करुन बाकीची नगद रक्कम दिलेली आहे. गैरअर्जदाराची पे-स्लीप मध्येही बदल केलेला दिसुन येत आहे. व्यवस्थापनाची मनशा न समजण्या सारखी आहे.
अर्जदार कामगारांना २०१७-२०१८ चा बोनस देण्यात आलेला नाही सन २०१७-२०१८ ची पगारी रजा किंवा मोबदला दिलेला नाही, भविष्य निर्वाह निधीची कपात कमी रक्कमेवर करण्यात येत आहे, तरीही कामरांनी तक्रार केलेली नाही. तसेच वेतन दिले इतर भत्ते (अंलाऊसेस) दिले परंतु महागाई भत्ता, (डि.ए, स्पेशल अलाऊंस) दिलेला नाही. कारखाण्या समोर युनियनचे बोर्ड लावण्यात आलेले आहे.
तेव्हा पासून गैरअर्जदार अधिकच कामगारांचा राग करुण कामगारावर अभद्र भाषेमध्ये राग काढण्यात येत आहे. तरीही कामगारांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. कारण कामगार कारागीर असून नोकरीची सुध्दा गरज आहे. अर्जदार कामगारांनी लाल बावटा अभियांत्रिकी कामगार संघटना जुने शहर, अकोला. या युनियन मध्ये सभासद 2 दिवस अगोदर स्विकारले आहे.
सदर युनियनची सभासदांची बैठक नुकतीच होवून वरील होणारे अन्याय दुर करण्याच्या दुष्टीने निवेदन सादर करुण खालील मागण्याची सोडवणूक त्वरित व्हावी या करीता सादर केले आहे. निवेदन दिल्या नंतर कॉ. रमेश गायकवाड यांनी कार्यालया बाहेर कामगार यांना संबोधित करताना म्हणाले की, अकोला एम.आय.डी.सी. अनेक कामगारावर अन्याय होत आहे बेरोजगारी खुप प्रमानात असल्याने मालक वर्ग मधमस्त आहे कोणत्याही कायद्याचे पालन करीत नाही उपस्थितांची ही आता जवाबदारी आहे त्यानी इतर कारखण्यातील कागराना एकजुट करावे, बेरोजगारांना एकजुट करुण बंद असलेले कारखाने शासनाने चालवावे, नवीन उद्योग आणून वाढत असलेली बेरोजगारी दुर करावी.
मागण्या :- १) अर्जदारांना हजेरी कार्ड.
२) जानेवारी २०१९ ते एप्रिल २०१९ महिण्या पर्यंत जे वेतन २ चेक बँके मध्ये दिले आहे. तेच वेतन एका चेक मध्ये बँकेमार्फत मिळवून द्यावे.
३) सन २०१७ – २०१८ चा बोनस दिलेला नाही तो मिळवून देण्यात यावा.
४) पगारी रजेची रक्कम मिळवुन देण्यात यावी.
५) भविष्य निर्वाह निधीची रक्कम मागील फरकासह भरुन किमान वेतन व राहणीमान भत्ता (डी.ए) वर कपात करुन भरण्यात यावी.
६) सहाय्यक कामगार आयुक्त अकोला यांना दिलेला नागपुरचा प्रभार काढुन रिक्त असलेले पद त्वरित भरावे. व कामगारांवर होत असलेल्या अन्याय ताबळतोब दुर करण्यात यावे. व कारखाना सुरु ठेवावा निवेदनावर कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, सैय्यद इरफान सैय्यद जाफर, दादाराव जंजाळ, श्रीकृष्ण वाकचौरे, प्रविन कळसकर, संतोष दाभाळे, संतोष खंडारे, कपील बलखेडे, रवि गणोरकर, राकेश येरे, राहुल इंगळे सह 12 कामगार उपस्थित होते.
अधिक वाचा : सिटी कोतवाली पोलिसांची वरली अड्ड्यावर धाड, मुद्देमालासह आरोपींना अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola