चौहोटा बाजार(प्रतिनिधी): अलीकडे अल्पवयीन युवा मुले मोबाईल वरील पब्जी खेळायचा आहारी गेल्याचे स्पष्ट होत असून अनेक महानगरांमध्ये या खेळाचे बळी गेले आहेत. अशातच अकोला जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचा पब्जी खेळाच्या अति ताणाने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसापासून सदर मुलगा रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर हा खेळ खेळत असल्याची माहिती असून गत सोमवारपासून त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर अकोल्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
येथून जवळच असलेल्या नखेगाव येथील वैभव अरुणराव मोडक 17 हा किंखेड पूर्णा येथील संत तुकाराम महाराज विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत होता, त्याला बहीण, एक भाउ आहे. आई-वडिलांसह सर्वांशी तो हसत खेळत असायचा. अशातच त्याला मोबाईल वरील पब्जी खेळण्याचा नाद लागल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत तो हा खेळ खेळायचा गत तीन जून रोजी गायवाड्यात गेला असता चक्कर येऊन पडला त्यानंतर काही वेळाने घरी आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडतच गेली. वैभवला येथील डॉक्टरला दाखवले असता त्याला अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले. अकोला येथील एका खासगी दवाखान्यात नेले असता त्याच्या मेंदूची नस फाटले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी तो कोमात गेला होता, त्या दवाखान्यात त्याच्या मेंदूवर एका शस्त्रक्रिया देखील करण्यात आले. मात्र 11 जून पर्यंत वैभव आल्याने जिल्हा सर्वोपचारमध्ये हलवण्यात आले.
अधिक वाचा : तंटामुक्त जिल्हा मूल्यमापन समितीवर सारंग कराळे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola